देगाव फाटा परीसरात 11 हजारांची घरफोडी

सातारा : देगाव फाटा परीसरात अज्ञात चोरट्याने 11 हजारांची घरफोडी केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 21 ते 22 जानेवारी दरम्यान देगाव फाटा परिसरातील हॉटेल अलका हाइट्स येथे अज्ञात चोरट्याने संकेत संतोष गावडे रा. अमरलक्ष्मी, देगाव रोड, सातारा यांच्या बंद हॉटेलचे कुलूप तोडून हॉटेलमधील अकरा हजार रुपये आणि महत्वाची कागदपत्रे असलेले पाकीट चोरून नेले आहे. अधिक तपास महिला पोलीस नाईक गोळे करीत आहेत.


मागील बातमी
संजय शेलार खून प्रकरणातील पाच संशयित जेरबंद
पुढील बातमी
मारहाण प्रकरणी दोन जणांविरोधात गुन्हा

संबंधित बातम्या