श्री ज्योतिर्लिंग यात्रेनिमित्त कुमठे येथे ‘प्रो कबड्डी लीग २०२६’; माऊली प्रतिष्ठान आणि चांगभले स्पोर्ट्स फाउंडेशनतर्फे आयोजन

by Team Satara Today | published on : 01 April 2026


सातारा : श्री ज्योतिर्लिंग यात्रेच्या पार्श्वभूमीवर कुमठे, ता. कोरेगाव येथे क्रीडाप्रेमींसाठी उत्साहवर्धक अशी राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या माऊली प्रतिष्ठान आणि चांगभले स्पोर्ट्स फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार, दि. १ एप्रिल रोजी दुपारी ४ वाजता तीळगंगा नदीपात्र मैदानावर ‘कुमठे प्रो कबड्डी लीग २०२६’ ही खुल्या गटाची स्पर्धा रंगणार आहे. या स्पर्धेबाबतची माहिती संस्थेचे अध्यक्ष राम जगदाळे यांनी दिली.

ग्रामीण भागातील खेळाडूंना व्यासपीठ मिळावे आणि कबड्डी या पारंपरिक खेळाला प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यभरातील विविध भागातून संघ सहभागी होणार असल्याने स्पर्धा चुरशीची होण्याची शक्यता आहे. यामुळे परिसरात आधीपासूनच क्रीडा वातावरण निर्माण झाले असून युवकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

स्पर्धेसाठी आकर्षक बक्षिसांचीही घोषणा करण्यात आली आहे. प्रथम क्रमांकासाठी २१ हजार १११ रुपये, द्वितीय क्रमांकासाठी १५ हजार ५५५ रुपये, तृतीय क्रमांकासाठी ९ हजार ९९९ रुपये आणि चतुर्थ क्रमांकासाठी ५ हजार ५५५ रुपये अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत. याशिवाय बेस्ट डिफेंडर आणि बेस्ट रायडर या विशेष पुरस्कारांसाठी प्रत्येकी २ हजार १११ रुपये देऊन खेळाडूंचा सन्मान करण्यात येणार आहे.

स्पर्धेचे नियम स्पष्ट करताना आयोजकांनी सांगितले की, पंचांचा निर्णय अंतिम राहणार असून खेळादरम्यान कोणत्याही खेळाडूस दुखापत झाल्यास त्याची जबाबदारी संबंधित खेळाडूचीच राहील. या स्पर्धेसाठी नाममात्र एक हजार रुपये प्रवेश फी निश्चित करण्यात आली आहे.

एकूणच, कुमठे येथे होणारी ही राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा क्रीडाप्रेमींसाठी एक पर्वणी ठरणार असून, स्थानिक तसेच राज्यभरातील खेळाडूंना आपले कौशल्य दाखवण्याची उत्तम संधी उपलब्ध होणार आहे. आयोजकांनी खेळाडू आणि प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या स्पर्धेचा आनंद घ्यावा, असे आवाहन राम जगदाळे यांनी केले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
कुऱ्हाडीने हल्लाप्रकरणी मुळीकवाडीचा आरोपी दोषी; न्यायालयाची शिक्षा
पुढील बातमी
लोककल्याणकारी कामांतून जनतेचे प्रश्न सोडवा - पालकमंत्री शंभूराज देसाई; पाटण पंचायत समितीला भेट

संबंधित बातम्या

भीषण स्फोटाने तासवडे एमआयडीसी परिसर हादरला; एसकेएस केमिकल कंपनीत भीषण स्फोट तासवडे : तासवडे एमआयडीसीमधील (ता. कराड) एसकेएस केमिकल कंपनीत भीषण स्फोट झाला. पहिल्या भीषण स्फोटानंतर आणखी आठ कमी तीव्रतेचे स्फोट झालेे. स्फोटाच्या आवाजामुळे एमआयडीसीच्या 10 किलोमीटर परिसरातील गावांतील ग्रामस्थांच्या अक्षरशः कानठळ्या बसल्या. तसेच, परिसरातील गावांमधील घरांना तडे जाण्यासह खिडक्यांच्या काचा फुटल्या आहेत. सुदैवाने कंपनी बंद असताना ही दुर्घटना घडली आणि त्यामुळे कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. एमआयडी