हिजबुल मुजाहिद्दीनच्या कुख्यात फरार दहशतवाद्याला एटीएसकडून अटक

by Team Satara Today | published on : 08 March 2025


उत्तर प्रदेशमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. उत्तर प्रदेशमध्ये एका फरार दहशतवाद्याला अटक करण्यात एटीएसला यश आले आहे. उत्तर प्रदेश एटीएस (दहशतवाद विरोधी पथकाने) मुरादाबाद पोलिसांच्या सहकार्याने 18 वर्षांपासून फरार असलेल्या हिजबुल मुजाहिद्दीनच्या दहशतवाद्याला अटक केली आहे. अटक केलेल्या हिजबुल मुजाहिद्दीनच्या दहशतवाद्याचे नाव उल्फत हुसेन उर्फ ​​मोहम्मद सैफुल्लाह इस्लाम असल्याचे समोर येत आहे.

उत्तर प्रदेश पोलिस आणि उत्तर प्रदेश एटीएसने या दहशतवाद्याला पकडण्यासाठी वा याची माहिती देणाऱ्या व्यक्तीसाठी 25 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. जममी काश्मीरमधील पूंछ जिल्ह्यात हा दहशतवादी वास्तव्य करत असल्याचे समजते आहे.  पूंछ जिल्ह्यातील रहिवासी उल्फत हुसेन हा देशविरोधी कारवायांमध्ये सहभागी असल्याची माहिती उत्तर प्रदेश एटीएसला मिळाली होती.

2001 च्या दरम्यान त्याला अटक झाल्यानंतर तो फरार झाला होता. मॅटर काल 7 मार्च रोजी उत्तर प्रदेश एटीएसने सहारनपूर युनिट आणि मुरादाबाद पोलिसांच्या मदतीने अटक केली आहे. उल्फत हुसेन हा फजलाबाद, सुरणकोट, पूंछ (जम्मू आणि काश्मीर) येथील रहिवासी आहे. त्याच्यावर मुरादाबादच्या कटघर पोलिस स्टेशनमध्ये खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात, शस्त्रास्त्र कायद्याच्या कलम २५, पोटाच्या कलम ३/४/५ आणि सीएलए कायद्याच्या कलम ७ नुसार गुन्हा दाखल झाला होता.

हुसेन, जो फजलाबाद, सुरणकोट, पूंछ (जम्मू आणि काश्मीर) येथील रहिवासी आहे, तो मुरादाबादच्या कटघर पोलिस स्टेशनमध्ये दाखल झालेल्या खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात, शस्त्रास्त्र कायद्याच्या कलम २५, कलम ३/४/५ आणि सीएलए कायद्याच्या कलम ७ मध्ये हवा होता. मुरादाबाद न्यायालयाने ७ जानेवारी २०१५ रोजी त्याच्याविरुद्ध कायमस्वरूपी वॉरंट जारी केले होते.

उत्तर प्रदेश एटीएसच्या अतिरिक्त महासंचालक नीलाबजा चौधरी यांनी सांगितले की, उल्फत हुसेनला पहिल्यांदा ९ जुलै २००१ रोजी अटक करण्यात आली होती.  त्याच्याकडून एक एके-४७, एक एके-५६, दोन ३० बोर पिस्तूल, १२ हँडग्रेनेड, ३९ टायमर, ५० डेटोनेटर, ३७ बॅटरी, २९ किलो स्फोटके, ५६० जिवंत काडतुसे आणि आठ मॅगझिनसह मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे आणि स्फोटके जप्त करण्यात आली होती.

अटक केलेल्या दहशतवाद्याची चौकशी  एटीसकडून सुरू आहे.  तसेच सुरक्षा संस्था त्याचा कोणत्याही नवीन दहशतवादी मॉड्यूलशी संबंध होता का?  किंवा तो मोठ्या कटाची तयारी करत होता का याचा तपास करत आहेत. त्याला लवकरच न्यायालयात हजर केले जाईल आणि पुढील कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे आता या अटक केलेल्या दहशतवाद्याकडून कोणती माहिती प्राप्त होते हे पाहणे आवश्यक असणार आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
संत्र्याच्या सालीत भरपूर अँटीऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन C, आणि इतर पोषक घटक
पुढील बातमी
मार्च महिन्यात जिल्ह्याचा पारा वाढला

संबंधित बातम्या