पाण्याच्या बॉटल बॉक्सच्या आडून बनावट दारूची तस्करी

मिरजेत राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

मिरज : गोवा आणि मध्य प्रदेश बनावटीच्या दारूची मिरजमार्गे तस्करी करणार्‍या दोघांना मिरज राज्य उत्पादन शुल्क विभागाने बुधवारी पहाटे अटक केली. जमीर अकबर मकानदार (वय 31, रा. पाडळी, जि. सातारा) व शब्बीर अल्लाउद्दीन मकानदार (27 रा. बालाजीनगर विजयनगर, सातारा) अशी त्यांची नावे आहेत. दोघांकडून विदेशी दारू आणि ट्रक असा 68 लाख 41 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

गोवा आणि मध्य प्रदेश बनावटीच्या दारूची मिरजमार्गे सोलापूरकडे तस्करी होणार असल्याची माहिती मिळाल्याने राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक प्रदीप पोटे यांच्या मार्गदर्शनाखाली मिरज राज्य उत्पादन शुल्क विभागाने मिरज-पंढरपूर मार्गावर सापळा लावला होता. त्यावेळी संशयीत ट्रक पंढरपूर रस्त्यावर आला असता, पथकाने तो अडविला. यावेळी ट्रकमध्ये पिण्याच्या पाण्याच्या बॉक्समध्ये गोवा आणि मध्य प्रदेश बनावटीची दारू आढळली. पथकाने 33 लाख रुपये किमतीची 651 बॉक्स दारू आणि ट्रक असा 68 लाख 41 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

मागील बातमी
एसटी बसस्थानकांवर "हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियान" राबविणार : परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
पुढील बातमी
सैफ अली खानला वेळेत रुग्णालयात पोहोचवून जीव वाचवल्याबद्दल रिक्षा चालकाला किती बक्षीस मिळालं?

संबंधित बातम्या