सातारा : शहरात चेन स्नॅचिंगच्या घटना पुन्हा डोके वर काढत असून संगमनगर परिसरात एका महिलेच्या गळ्यातील सुमारे 50 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे मंगळसूत्र अज्ञात चोरट्याने जबरदस्तीने हिसकावून नेल्याची घटना घडली आहे. याबाबत सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 16 रोजी रात्री सुमारे 9 वाजण्याच्या सुमारास कांचन संतोष काडगे मूळ रा. फणसगाव विठ्ठलादेवी, ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग, सध्या (रा. आश्विनी पार्क, संगमनगर, सातारा) या प्रतापसिंहनगर येथील सिद्धीविनायक मंगल कार्यालयातून आश्विनी पार्ककडे पायी जात असताना एका अज्ञाताने त्यांच्या गळ्यातील अंदाजे 50 हजार रुपये किंमतीचे मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून पळ काढला. या मंगळसूत्रात 5 ते 6 ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या वाट्या तसेच सुमारे 3 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मणी होते. या प्रकरणी अज्ञाताविरुद्ध सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस हवालदार पोतेकर पुढील तपास करत आहेत.