करंजेत गॅरेज चालकावर कोयत्याने हल्ला; संतप्त नागरिकांकडून हल्लेखोराला मारहाण करण्याचा प्रयत्न; शाहूपुरी पोलिसांकडून एकजण ताब्यात

by Team Satara Today | published on : 25 February 2026


सातारा  : सातारा-मेढा रस्त्यावर करंजे नाका येथे बुधवारी सायंकाळी एका तरुणावर धारदार कोयत्याने जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. अक्षय रामदास गाडे (रा. सातारा) याच्यावर अज्ञात कारणावरून कोयत्याने वार करण्यात आले. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सायंकाळच्या सुमारास करंजे नाका परिसरात अक्षय गाडे याच्यावर संशयित हल्लेखोराने अचानक कोयत्याने हल्ला चढवला. या हल्ल्यात गाडे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हल्ल्याचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे.

घटनेनंतर परिसरातील संतप्त नागरिकांनी हल्लेखोराला पकडून मारहाण करण्याचा प्रयत्न केला. परिस्थिती चिघळत असल्याचे लक्षात येता शाहूपुरी पोलिस स्टेशनचे पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी जमावाच्या तावडीतून हल्लेखोराची सुटका करत त्याला ताब्यात घेतले.यावेळी पोलिस निरीक्षक सचिन मेह्त्रे घटनास्थळी उपस्थित होते. काही संतप्त नागरिकांनी त्यांच्याशी हुज्जत घालण्याचाही प्रयत्न केल्याची माहिती मिळाली. मात्र पोलिसांनी संयम राखत परिस्थिती नियंत्रणात आणली.

या प्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. हल्ल्यामागील कारणांचा शोध पोलिस घेत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निवडीला 20 मार्चची डेडलाईन; ग्रामविकास मंत्रालयाचा फतवा :महायुतीला समीकरणे जुळवावी लागणार
पुढील बातमी
सातारा बसस्थानकाचे रुपडे लवकरच पालटणार; ना. शिवेंद्रसिंहराजे आणि ना. प्रतापराव सरनाईक यांच्यात सकारात्मक चर्चा

संबंधित बातम्या