प्रचंड संख्येने आंबेडकरवादीयांकडून आंदोलन संपन्न

by Team Satara Today | published on : 07 March 2025


सातारा : बिहारमधील बुद्धगया येथील महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनास पाठिंबा देण्याकरीता  भारतीय बौद्ध महासभा, त्रिरत्न महासंघ आदी धार्मिक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीसह विविध सामाजीक, रिपब्लिकन सेना, वंचित, आरपीआय आदी राजकीय  विविध संघटना अर्थात, आंबेडकरवादीयांकडून जिल्हाधिकारी कार्यालयामोर हजारोंच्या संख्येने भव्य दिव्य घोषणाबाजीने धरणे आंदोलन संपन्न झाले.

भारत देशातील बिहार राज्यातील बुद्धगया या ठिकाणी महाबोधी महाबुद्धविहार हे बौद्ध धर्मीयांच्या ताब्यात नसून ते तेथील हिंदूंच्या ताब्यात असल्याने ते महाबोधी महाविहार हे बौद्धांच्या ताब्यात मिळावे. याकरीता अनेक दशके प्रयत्न चालू आहेत. आता सदर आंदोलनास देशव्यापी स्वरूप निर्माण झाल्याने तो लढा हा तमाम बौद्धांच्या अस्मित्तेचा लढा निर्माण झाल्याने सदर आंदोलनास वेळ काढून सर्व आंबेडकरवादी यांनी आंदोलनात सहभाग घेतला.आपल्या अस्मित्तेसाठी व अस्तित्वासाठी प्रचंड संख्येने कार्यकर्ते जिल्ह्यांतून आले होते.

प्रथमतः उपासिकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. समता सैनिक दलातर्फे सलामी देण्यात आली.वंदना सामुदायिक घेण्यात आली. तेव्हा भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष अशोक भालेराव,सरचिटणीस दिलीप फणसे,ट्रस्टी प्रमुख अरुण पोळ,केंद्रीय शिक्षक भागवत भोसले व सहकारी,डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीचे कार्याध्यक्ष अनिल वीर,आसनगावचे विलास कांबळे,समता सैनिक,उपासक व उपासिका मोठ्या संख्येनी उपस्थीत होत्या.त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनात सहभागी झालेत. संपूर्ण परिसरात प्रचंड गर्दी होती.उपासिका-उपासक मोठमोठ्यानी घोषणात मशगुल होते. घोषणात रिपब्लिकन सेनेचे प.सम्पर्कप्रमुख चंद्रकांत खंडाईत यांच्यासह वंचितचे जिल्हा उपाध्यक्ष सुभाष गायकवाड, बाळासाहेब जगताप, गौरव भंडारे, रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष सुनील कदम, भारतीय बौद्ध महासभेचे सुनील सकपाळ आदींचा पुढाकार होता.यावेळी विविध चॅनेलवाले मुलाखती घेत होते.त्यात ज्येष्ट साहित्यिक पार्थ पोळके, रिपब्लिकन सेनेचे चंद्रकांत खंडाईत, महासभेचे जिल्हाध्यक्ष अशोक भालेराव, मीनाताई इंजे आदींचा समावेश होता.यावेळी शाहिर श्रीरंग रणदिवे यांनी गीते गायली. आंदोलनात सर्वच संघटनांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता. त्यामध्ये महाविहार बांधकाम कमिटीचे अध्यक्ष व्ही.आर.थोरवडे,भारतीय बौद्ध महासभेचे कराड तालुकाध्यक्ष आप्पा अडसुळे,ट्रस्टी अरुण पोळ,नंदकुमार काळे, विजय गायकवाड, राजु टेलर, प्रकाश तासगावकर, आदी प्रत्येक तालुक्यातील पदाधिकारी व सहकारी, रिपब्लिकन सेनेचे गणेश कारंडे, दयानंद बनसोडे, आदिनाथ बिराजे, बाळासाहेब सावंत, दादासाहेब केंगार, सुनील मोरे, सतीश माने, सुनील निकाळजे, आबा देवकांत, सचिन कांबळे आदी जिल्ह्यातील पदाधिकारी,  कार्यकर्ते, सरपंच नानासाहेब, मंगेश डावरे, दादासाहेब कांबळे, वंचित जावली तालुका महासचिव सचिव योगेश कांबळे व सहकारी तसेच जावली तालुक्यातील महासभेचे पदाधिकारी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीचे उपाध्यक्ष ऍड.हौसेराव धुमाळ, ऍड.विलास वहागावकर, अनिल वीर व सर्व पदाधिकारी, सदस्य, चंद्रकांत मस्के, दिलीप सावंत, पी.डी. साबळे, अशोक भोसले, अंकुश धाइंजे, डी.एस भोसले, सम्यक ज्येष्ठ नागरीक संघाचे बी.एल. माने, सामाजिक कार्यकर्ते तुषार मोतलींग, संबोधी प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष रमेश इंजे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष बंधुत्व युवा पुरस्कार विजेते शाहिर वैभव गायकवाड व असंख्य सहकारी उपस्थित होते. विशेषतः युवती-महिलांचा सहभागही लक्षणीय होता. सरतेशेवटी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर करण्यात आले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातारा तालुक्यात 709 खातेदारांच्या वारस नोंदी
पुढील बातमी
पोलिस भरतीकडे युवा वर्गाचा वाढता कल

संबंधित बातम्या