मंत्री जयकुमार गोरे यांची उपस्थितीत माण-खटाव तालुक्यातील पाणी टंचाई संदर्भातील आढावा बैठक संपन्न; आवश्यक त्या उपाययोजना तातडीने राबविण्याच्या सूचना

by Team Satara Today | published on : 04 July 2026


सातारा  : माण-खटाव तालुक्यातील  पाणी टंचाई संदर्भात दहिवडी, ता माण येथे आज  ग्रामीण विकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली. बैठकीत तालुक्यातील पाणीपुरवठ्याची सद्यस्थिती, टंचाईग्रस्त गावांमधील उपाययोजना तसेच नागरिकांना अखंड व सुरळीत पाणीपुरवठा सुनिश्चित करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. संबंधित विभागातील अधिकाऱ्यांना आवश्यक त्या उपाययोजना तातडीने राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती, पंचायत समिती सदस्य, आणि संबंधित विभागाचे अधिकारी-कर्मचारी, पदाधिकारी तसेच मान्यवर उपस्थित होते.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
महाबळेश्वर तालुक्यात मुसळधार पावसामुळे नावली गावात काही भाग खचला; प्रशासनाने केले नागरिकांचे सुरक्षित स्थलांतर
पुढील बातमी
मुंबईत मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत; महापुरासारखी परिस्थिती, रस्ते जलमय; घरांमध्ये पाणी, नागरिकांचे हाल

संबंधित बातम्या