सातारा जिल्हा परिषदेचे १९ शेतकऱ्यांना शेती पुरस्कार जाहीर

कृषी दिनी प्रदान होणार

by Team Satara Today | published on : 28 June 2025


सातारा : कृषी क्षेत्रात उज्वल कामगिरी करुन इतरांपुढे आदर्श ठेवणाऱ्या जिल्ह्यातील १९ शेतकऱ्यांना शेतीविषक पुरस्कार जिल्हा परिषदेकडून जाहीर झाले आहेत. सेंद्रीय, फलोत्पादन, पुष्पोत्पादन अन् दुग्धोत्पादनातील हे पुरस्कार आहेत. २०२४-२५ वर्षातील हे पुरस्कार असून दि. १ जुलै या कृषी दिनी या पुरस्काराचे वितरण होणार आहे.

सातारा जिल्हा परिषदेच्यावतीने दरवर्षी शेती क्षेत्रात चांगले काम करणाऱ्या शेतकऱ्यांना पुरस्कार देऊन गाैरविण्यात येते. कृषी विभागाच्यावतीने हे पुरस्कार दिले जातात. कृषी विभागाच्यावतीने सेंद्रीय शेती, फुले, फळे आणि दुग्धक्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या १९ शेतकऱ्यांना पुरस्कार जाहीर झाले आहेत. २०२४-२५ वर्षातील हे पुरस्कार आहेत. एक जुलै रोजी जिल्हा परिषदेतच या पुरस्काराचे वितरण होणार आहे. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास सीद, जिल्हा कृषी विकास अधिकारी गजानन ननावरे आदी उपस्थित राहणार आहेत.

पुरस्काराचे नाव  - शेतकऱ्याचे नाव  - क्रमांक

डाॅ. जे. के. बसू सेंद्री  - प्रदीप कोंडीबा शेलार, कोयनानगर, ता. पाटण  -  १

शेती पुरस्कार  - सुरेश सीताराम बोराटे, बिदाल, ता. माण -  २

अमोल भानुदास भोसले, एकसळ, ता. कोरेगाव ३

अशोक ज्ञानोबा जाधव, चिंचणेर निंब, ता. सातारा उत्तेजनार्थ

संदीप जयवंत चव्हाण, असवली, ता. खंडाळा उत्तेजनार्थ

दिवंगत यशवंतराव चव्हाण - बबन रामचंद्र मुळीक, सासकल, ता. फलटण १

फलोत्पादन शेती पुरस्कार - महेंद्र देवराव धुमाळ, धुमाळवाडी, ता. फलटण २

उत्तम विनायक गाडे, आसनगाव, ता. कोरेगाव ३ विभागून

बाळकृष्ण उत्तम बंडगर, होलेवाडी, ता. कोरेगाव ३ विभागून

शंकर बाळू जाधव, भाटमरळी, ता. सातारा उत्तेजनाऱ्थ

आमच्या न्यूजलेटरसाठी साईन-अप करा

दिवंगत यशवंतराव चव्हाण - सचिन रमेश शेलार, म्हसवे, ता. सातारा १

पुष्पोत्पादन शेती पुरस्कार - अजित दिनकर पाटील, मांडवे, ता. खटाव २

संजय जगन्नाथ पवार, वडोली निळेश्वर, ता. कऱ्हाड ३

दिवंगत यशवंतराव चव्हाण - शिवम भरत जाधव, पुसेगाव, ता. खटाव १ विभागून

दुग्धोत्पादन शेती पुरस्कार - दीपाली संदीप भागवत, कण्हेरी, ता. खंडाळा १ विभागून

स्वाती विजयकुमार पवार, मुंजवडी, ता. फलटण २ विभागून

मनिषा संदीप पवार, राजाळे, ता. फलटण २ विभागून

मानसी चैतन्य कणसे, शेणोली, ता. कऱ्हाड ३ विभागून

गणपत श्रीपती सपकाळ, चोरांबे, ता. जावळी ३ विभागून

चार महिला शेतकरी; फलटणला चार पुरस्कार..

जिल्ह्यातील एकूण १९ शेतकऱ्यांना पुरस्कार देण्यात येणार आहे. यामध्ये चार महिला शेतकरीही आहेत. तसेच जिल्ह्यात सर्वाधिक चार पुरस्कार हे फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहेत. यानंतर सातारा आणि कोरेगाव तालुक्यातील प्रत्येकी तिघांना पुरस्कार जाहीर झाला आहे. वाई आणि महाबळेश्वर तालुक्यातील एकाही शेतकऱ्याला पुरस्कार मिळालेला नाही.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
बेकायदा दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई
पुढील बातमी
काँग्रेसने संविधानाचा गळा घोटला

संबंधित बातम्या