त्या विद्यार्थिनीची आत्महत्या मानसिक तणावातून; वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हेत्रे यांची माहिती

by Team Satara Today | published on : 03 September 2026


सातारा : मानसिक तणावातूनच वाय सी कॉलेज होस्टेलच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून त्या विद्यार्थिनींनी आत्महत्या केल्याची माहिती सातारा शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हेत्रे यांनी दिली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी, संबंधित विद्यार्थीनीने हॉस्टेलमध्ये एक चूक केल्याने तिच्या पालकांना बोलावून घेण्यात आले होते. पालकांच्या भीतीपोटी व खजील झाल्याने दि. 2 रोजी रात्री सुमारे अकरा वाजण्याच्या दरम्यान सातारा शहरातील वाय सी कॉलेजच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून त्या विद्यार्थिनीने आत्महत्या केली आहे. याबाबत संबंधित विद्यार्थिनीच्या पालकांनीही कोणावर गुन्हा दाखल केलेला नाही. पुढील तपास पोलीस निरीक्षक म्हेत्रे करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातारा हिल हाफ मॅरेथॉनच्या पार्श्‍वभूमीवर रविवार दि. 6 सप्टेंबर रोजी सातारा शहरातील वाहतुकीत बदल
पुढील बातमी
नागठाणे गावच्या हद्दीत दुचाकी अपघातात एकाचा मृत्यू, एकजण गंभीर

संबंधित बातम्या