मुंबई : पावसाळा हा अनेकांचा आवडता ऋतू आहे. अनेकांसाठी पावसाळा हा आनंददायी असतो. पण हा आनंददायी पावसाळा सोबत अनेक आजारही घेऊन येतो. अशा परिस्थितीत जर तुम्ही तुमच्या आहाराची विशेष काळजी घ्यायला हवी. त्यामुळे तुम्ही दूषित पाण्यानं होणारे आजार, संसर्ग इत्यादीपासून सुरक्षित राहू शकता. पावसाळ्यात आरोग्य चांगलं राहण्यासाठी सकस आहार घेणं अत्यंत गरजेचं आहे. अशा परिस्थितीत तुम्ही काही फळं आणि भाज्यांचं आवर्जून सेवन केलंच पाहिजे. हे फळं आणि भाज्या खाल्याने तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढते. आज आम्ही तुम्हाला अशाच काही फळांविषयी सांगणार आहोत जे पावसाळ्यात निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी खाणं आवश्यक आहे.
मनुका :
TOI मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका बातमीनुसार, पावसाळ्यात मनुका खाल्ल्यास तुमची रोगप्रतिकार शक्ती वाढेल. मनुका खाल्ल्यानं पावसाळा या ऋतूत होणाऱ्या किरकोळ आजार आणि संसर्गापासूनही संरक्षण मिळेल, कारण त्यात भरपूर व्हिटॅमिन सी, के, कॉपर, फायबर, पोटॅशियम असतं. तसंच मनुकांमुळे बद्धकोष्ठतेपासूनही आराम मिळतो.
जांभूळ :
या काळात भरपूर प्रमाणात जांभूळ उपलब्ध असतं. जांभूळ खाणं मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर असतं, कारण ते रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवतं. जांभळामध्ये कॅल्शियम असतं, जे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी फायदेशीर असतं. त्यामुळे पोटाचं आरोग्यही चांगले राहतं. पावसाळ्यात बहुतेकांना पोटाशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागतो. जर तुम्हाला उलट्या, मळमळ, पोटदुखी आणि संसर्गापासून सुरक्षित राहायचे असेल तर तुम्ही जांभूळ खाऊ शकता. रक्ताभिसरण, यकृत आणि किडनीच्या कार्यातही हे फळ फायदेशीर आहे. यामध्ये व्हिटॅमिन सी आणि फायबरसोबत लोह असतं, जे रोगप्रतिकारशक्ती वाढवतं.
लिची : पावसाळ्यात ‘लिची’ हे फळही मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतं. त्यात भरपूर पाणी असतं. लिचीचा रस ऍसिड रिफ्लक्स, सर्दी आणि पाचन समस्या दूर करतो. पावसाळ्यात श्वास घेण्यास त्रास होत असेल तर लिचीचे सेवन करा. याशिवाय, ते रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचे काम करतं.
नाशपती : पावसाळ्यात तुम्ही दररोज 1 नाशपती खाल्ल्यास ते तुमची प्रतिकारशक्ती मजबूत करतं. फायबरयुक्त असलेल्या या हंगामी फळाचा आहारात समावेश करून स्वत:ला निरोगी ठेवा.
पावसाळ्यात सफरचंद आणि डाळिंब या फळांचं सेवन केल्यास ते अनेक प्रकारे फायदेशीर ठरतं. भरपूर लोह आणि विविध जीवनसत्त्वे असलेलं सफरचंद शरीरातील लोहाची कमतरता टाळतं. तर डाळिंब तुम्हाला पावसाळ्यात तुम्हाला फिट ठेवते.
गळफास घेऊन एकाची आत्महत्या |
दुचाकीला कुत्रे आडवे आल्याने एकाचा मृत्यू |
जीवन प्राधिकरण कर्मचार्यांचे वेतन आयोगासाठी आंदोलन |
कॉंग्रेस पक्ष वाढीसह विधानसभेला हवे सुक्ष्म नियोजन |
वंचित आघाडीच्या वतीने 58 उमेदवारांच्या मुलाखती |
कॉंग्रेस पदाधिकार्याच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे |
लहुजी शक्ती सेनेची जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने |
उपसा जलसिंचन योजनांच्या ३३६६ कोटींच्या सौर ऊर्जीकरणास सुरुवात |
कंत्राटी 83 पात्र उमेदवारांची ग्रामसेवकपदी नियुक्ती |
झेडपीच्या ठराव समिती सभेत विविध विषयांवर चर्चा |
मारहाण प्रकरणी एकावर गुन्हा |
सातारा शहरासह तालुक्यातील आठ जुगार अड्ड्यांवर छापे |
गळफास घेऊन एकाची आत्महत्या |
भरधाव कारच्या धडकेत शाळकरी मुलगी ठार |
फलटणची कुरेशी टोळी जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार |
कॉंग्रेस पदाधिकार्याच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे |
लहुजी शक्ती सेनेची जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने |
उपसा जलसिंचन योजनांच्या ३३६६ कोटींच्या सौर ऊर्जीकरणास सुरुवात |
कंत्राटी 83 पात्र उमेदवारांची ग्रामसेवकपदी नियुक्ती |
झेडपीच्या ठराव समिती सभेत विविध विषयांवर चर्चा |
मारहाण प्रकरणी एकावर गुन्हा |
सातारा शहरासह तालुक्यातील आठ जुगार अड्ड्यांवर छापे |
गळफास घेऊन एकाची आत्महत्या |
भरधाव कारच्या धडकेत शाळकरी मुलगी ठार |
फलटणची कुरेशी टोळी जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार |
झेडपीच्या आरोग्य विभागात 243 जणांना नियुक्ती |
उद्या शासकीय विश्रामगृहामध्ये होणार 'वंचित' च्या मुलाखती |
राजधानी रास दांडियाचे उदंड महिलांच्या प्रतिसादात उद्घाटन |
राज्य नाट्य स्पर्धेचे केंद्र सातारा जिल्ह्यात |
खोटं बोलणार्या कॉंग्रेसला मतदारांनी हरवलं : विकास गोसावी |