सोळाव्या शतकातील थोर संत रामदास स्वामींचा जीवनप्रवास, त्यांनी केलेले कार्य आणि त्यांची शिकवण यात आहे. १६०८ मध्ये जांब गावी सूर्याजीपंत आणि राणूबाई यांना द्वितीय पुत्ररत्नाचा लाभ झाला. या मुलाचे नाव नारायण ठेवण्यात आले. बालपणापासूनच नारायणाला संपूर्ण विश्वाची चिंता सतावू लागली. १२ व्या वर्षी नारायणाचे लग्न ठरवले जाते, पण मंगलाष्टकातील 'शुभमंगल सावधान' शब्द ऐकताच तो लग्न मंडपातूनच पळ काढतो. प्रभू श्रीरामाच्या भक्तीत तल्लीन होऊन १२ वर्षे भ्रमंती करत असताना नारायणाचे रामदास स्वामी बनतात.
लेखन-दिग्दर्शन : ज्ञान, भक्ती आणि शक्तीचा अनोखा संगम घडवणारी कथा प्रेरणादायी असून, आध्यात्माने ओतप्रोत भरलेली आहे. पटकथेची मांडणीही त्याच पद्धतीची आहे. रामदास स्वामींनी लिहिलेले मनाचे श्लोक शाळकरी मुलांनाही तोंडपाठ आहेत. भक्तीसोबत त्यांनी व्यायामाचे महत्त्वही पटवून दिले. परचक्र येताच टाळ वाजवणाऱ्या हातांना तलवारीही धरता आल्या पाहिजेत हा संदेश जनमानसापर्यंत पोहोचवला. जागोजागी मठ सुरू करताना स्त्री सक्षमीकरणाचे महत्त्वही पटवले. ११ मारूतींची प्राणप्रतिष्ठापना केली. दासबोधसारखा महान ग्रंथ लिहिला. कल्याणसारखे असंख्य शिष्य घडवत आपल्या पश्चातही रामनामाचा यज्ञ अखंडपणे सुरू ठेवला. संवाद मार्मिक आणि अर्थपूर्ण आहेत. काही घटना अधिक तपशीलवार येण्याची गरज होती. सोळाव्या शतकातील वातावरण निर्मिती करण्याचा चांगला प्रयत्न केला आहे. नाट्यमय घडामोडी फार नसल्याने काहीसा माहितीपटासारखा फिल येतो. रवींद्र साठ्येंच्या आवाजातील गाणे श्रवणीय आहे. हिमालयापासून वाळवंटापर्यंतचे चित्रीकरण अप्रतिम आहे.
अभिनय : यापूर्वी ऐतिहासिक भूमिकांमध्ये झळकलेल्या विक्रम गायकवाडने समर्थ रामदास स्वामींच्या भूमिकेत जीव ओतण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. संयमी व्यक्तिरेखा साकारताना चुकीचे दिसताच तापट स्वभावाची झलकही चांगल्याप्रकारे सादर केली आहे. ऋजुता देशमुख आईच्या व्यक्तिरेखेत शोभत नसली तरी तिने चांगले काम केले आहे. नवीन प्रभाकरने काहीसा ग्रे शेडेड वाटणारा छोटासा रोल उत्तम केला आहे. याखेरीज शैलेश दातार, राहुल मेहेंदळे, विघ्नेश जोशी, निनाद कुलकर्णी, भूषण तेलंग, वर्षा दांदळे, मौसमी तोंडवळकर यांनीही चांगली साथ दिली आहे.
परळीतील घरफोडीच्या गुन्ह्याची केवळ बारा तासात उकल |
शाहूनगर येथे सुमारे लाखाची घरफोडी |
अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी तिघांवर पोक्सो दाखल |
कॅबिनेट मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांची होणार जगप्रसिद्ध कंदी पेढ्याने तुला |
आदित्यची तळमावले, साईकडेत मिरवणूक |
कराडात सोळा लाखांची ऑनलाईन फसवणूक |
कोरेगांव तालुक्यात कुणबी-मराठा आढळलेल्या नोंदीची यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध |
गव्याच्या हल्ल्यात शेतमजुराचा मृत्यू |
पुसेगाव येथील यात्रे निमित्त वाहतुकीत बदल |
कंपनीच्या पार्किंग मधून दुचाकीची चोरी |
परळी येथे सुमारे तीन लाखांची घरफोडी |
रविवारी कॅबिनेट मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे जिल्ह्यात होणार जंगी स्वागत |
जिल्ह्यातील टपाल इमारतींच्या दुरुस्तींची मागणी |
सातारा पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी विठ्ठल हेंद्रे बिनविरोध |
नागठाणेतील घाडगे हॉस्पिटलमधील नवजात शिशू मृत्यू प्रकरण |
कराडात सोळा लाखांची ऑनलाईन फसवणूक |
कोरेगांव तालुक्यात कुणबी-मराठा आढळलेल्या नोंदीची यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध |
गव्याच्या हल्ल्यात शेतमजुराचा मृत्यू |
पुसेगाव येथील यात्रे निमित्त वाहतुकीत बदल |
कंपनीच्या पार्किंग मधून दुचाकीची चोरी |
परळी येथे सुमारे तीन लाखांची घरफोडी |
रविवारी कॅबिनेट मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे जिल्ह्यात होणार जंगी स्वागत |
जिल्ह्यातील टपाल इमारतींच्या दुरुस्तींची मागणी |
सातारा पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी विठ्ठल हेंद्रे बिनविरोध |
नागठाणेतील घाडगे हॉस्पिटलमधील नवजात शिशू मृत्यू प्रकरण |
बिल्डर्स असोसिएशनच्या - रचना प्रॉपर्टी एक्स्पो २०२४ बांधकाम विषयक प्रदर्शनाच्या मंडप उभारणीचा शुभारंभ |
दुष्काळ आणि रेल्वेच्या प्रश्नांवर आ. मनोजदादांनी सभागृहाचे लक्ष वेधले |
करिअर मेळाव्याचे 1 व 2 जानेवारी रोजी आयोजन |
साफसफाई व आरोग्यास धोकादायक क्षेत्रात काम करणाऱ्या पालकांच्या मुलांना शिष्यवृत्ती योजना लाभ घेण्याचे आवाहन |
'जिल्हा परिषद आपल्या दारी' उपक्रम लवकरच सुरु |