सातारा : नगरपालिकेच्या माजी नगरसेविका व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या कॉ अंजलीताई महाबळेश्वरकर (८९ ) यांचे आज रात्री पुणे येथे दुःखद निधन झाले. कॉ अंजलीताई महाबळेश्वरकर या त्यांची कन्या गौरी देशपांडे महाबळेश्वरकर यांच्याकडे पुणे येथे अलीकडेच राहायला गेल्या होत्या. माकप चे ज्येष्ठ नेते कॉ प्रभाकर महाबळेश्वरकर यांच्या त्या पत्नी होत्या.
सातारा नगर परिषदेच्या राजकारणात या एकमेव विरोधी पक्षनेत्या त्या कालावधीत होत्या आणि आपल्या म्हणण्याशी व तत्वांशी त्या नेहमीच आग्रही राहिल्या. जनवादी महिला संघटना , अंगणवाडी कर्मचारी संघटना , घरेलू कामगार संघटना, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष यांच्याशी त्या नेहमीच सक्रिय राहिल्या होत्या. अगदी अलीकडेच त्यांना मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या वृंदा करात , मरियम बूटवाला ढवळे अशोक ढवळे हे भेटून गेले होते व प्रकृतीची चौकशी केली होती