सातारा : कोयत्याने वार केल्याप्रकरणी एकावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 11 रोजी संध्याकाळी साडेसहा वाजता हिम्मत लक्ष्मण साळुंखे रा. कारंडवाडी, सातारा यांना जमिनीच्या वादाच्या कारणातून तेथीलच पांडुरंग सिद्धू साळुंखे यांनी कोयत्याने वार करून जखमी केले आहे. अधिक तपास पोलीस हवालदार राऊत करीत आहेत.