01:43pm | Aug 21, 2024 |
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी युक्रेन दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत. त्याचवेळी मॉस्कोवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला झालाय. 21 आणि 22 ऑगस्टला मोदी पोलंडमध्ये असतील. त्यानंतर 23 ऑगस्टला मोदी युक्रेनमध्ये असतील. 45 वर्षानंतर भारताचा कुठला पंतप्रधान युक्रेनमध्ये जाणार आहे. त्याआधी युक्रेनने रशियाच्या मॉस्को शहरावर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला केला आहे. युक्रेनने मॉस्कोवर आतापर्यंतचा सर्वात मोठा ड्रोन हल्ला केला आहे अशी माहिती मेयर सर्गेई सोबयानिन यांनी दिली.
युक्रेनने मॉस्कोवर आतापर्यंतचा सर्वात मोठा ड्रोन हल्ला केला आहे. रशियन एअर फोर्सने राजधानीच्या दिशेने येणारे कमीत कमी 10 ड्रोन्स नष्ट केले आहेत. पोडॉल्स्क शहरातही काही ड्रोन्स नष्ट करण्यात आलेत अशी माहिती मेयर सर्गेई सोबयानिन यांनी दिली.
संरक्षण मंत्रालयाच्या एअर डिफेन्स सिस्टिमने शत्रूचा UAV हल्ला हाणून पाडला. जिथे ही ड्रोन्स पाडण्यात आली तिथे कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. मागच्यावर्षी मे महिन्यात झालेल्या ड्रोन हल्ल्यानंतरचा हा सर्वात मोठा हल्ला आहे. मागच्यावर्षी मॉस्कोमध्ये 8 ड्रोन्स नष्ट करण्यात आले होते. यावेळी 10 ड्रोन्स नष्ट करण्यात आले. सोबयानिन यांनी पहाटे 4:43 वाजता टेलीग्रामवर ही माहिती दिली.
ड्रोन हल्ल्यात कुठलीही जिवीतहानी झाल्याची माहिती नाहीय असं रशियाच्या ब्रायंस्क क्षेत्राचे गवर्नर एलेक्जेंडर बोगोमाज यांनी सांगितलं. एक रिपोर्टनुसार, रशियाच्या तुला क्षेत्रात दोन ड्रोन्स नष्ट करण्यात आले. हा भाग उत्तरेला मॉस्को क्षेत्राच्या सीमेजवळ आहे. त्या शिवाय रशियाच्या साउथ-वेस्ट रोस्तोव क्षेत्राचे गवर्नर वसीली गोलुबेव यांनी सांगितलं की, एअरफोर्सने हवेतच युक्रेनची मिसाइल्स नष्ट केली. यात कोणीही जखमी झालेलं नाहीय.
परळीतील घरफोडीच्या गुन्ह्याची केवळ बारा तासात उकल |
शाहूनगर येथे सुमारे लाखाची घरफोडी |
अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी तिघांवर पोक्सो दाखल |
कॅबिनेट मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांची होणार जगप्रसिद्ध कंदी पेढ्याने तुला |
आदित्यची तळमावले, साईकडेत मिरवणूक |
कराडात सोळा लाखांची ऑनलाईन फसवणूक |
कोरेगांव तालुक्यात कुणबी-मराठा आढळलेल्या नोंदीची यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध |
गव्याच्या हल्ल्यात शेतमजुराचा मृत्यू |
पुसेगाव येथील यात्रे निमित्त वाहतुकीत बदल |
कंपनीच्या पार्किंग मधून दुचाकीची चोरी |
परळी येथे सुमारे तीन लाखांची घरफोडी |
रविवारी कॅबिनेट मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे जिल्ह्यात होणार जंगी स्वागत |
जिल्ह्यातील टपाल इमारतींच्या दुरुस्तींची मागणी |
सातारा पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी विठ्ठल हेंद्रे बिनविरोध |
नागठाणेतील घाडगे हॉस्पिटलमधील नवजात शिशू मृत्यू प्रकरण |
कराडात सोळा लाखांची ऑनलाईन फसवणूक |
कोरेगांव तालुक्यात कुणबी-मराठा आढळलेल्या नोंदीची यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध |
गव्याच्या हल्ल्यात शेतमजुराचा मृत्यू |
पुसेगाव येथील यात्रे निमित्त वाहतुकीत बदल |
कंपनीच्या पार्किंग मधून दुचाकीची चोरी |
परळी येथे सुमारे तीन लाखांची घरफोडी |
रविवारी कॅबिनेट मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे जिल्ह्यात होणार जंगी स्वागत |
जिल्ह्यातील टपाल इमारतींच्या दुरुस्तींची मागणी |
सातारा पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी विठ्ठल हेंद्रे बिनविरोध |
नागठाणेतील घाडगे हॉस्पिटलमधील नवजात शिशू मृत्यू प्रकरण |
बिल्डर्स असोसिएशनच्या - रचना प्रॉपर्टी एक्स्पो २०२४ बांधकाम विषयक प्रदर्शनाच्या मंडप उभारणीचा शुभारंभ |
दुष्काळ आणि रेल्वेच्या प्रश्नांवर आ. मनोजदादांनी सभागृहाचे लक्ष वेधले |
करिअर मेळाव्याचे 1 व 2 जानेवारी रोजी आयोजन |
साफसफाई व आरोग्यास धोकादायक क्षेत्रात काम करणाऱ्या पालकांच्या मुलांना शिष्यवृत्ती योजना लाभ घेण्याचे आवाहन |
'जिल्हा परिषद आपल्या दारी' उपक्रम लवकरच सुरु |