सातारा : सुमारे 40 हजार रुपये किमतीच्या तांब्याच्या तारेची चोरी केल्याप्रकरणी अज्ञाताविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 23 ते 24 दरम्यान नागेवाडी, ता. सातारा गावच्या हद्दीतील नंदकुमार कन्स्ट्रक्शन प्लांट येथून सुमारे 40 हजार रुपये किंमतीच्या तांब्याच्या तारेची चोरी केल्याप्रकरणी अज्ञाताविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार कुमठेकर करीत आहेत.