गुरुवार पेठेत शेजाऱ्यांकडून त्रास; रहिवाशाविरुद्ध पोलिसांत तक्रार

by Team Satara Today | published on : 09 June 2026


सातारा : गुरुवार पेठ परिसरात एका महिलेला वारंवार शिवीगाळ करून मानसिक त्रास दिल्याप्रकरणी एका व्यक्तीविरोधात सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

सरला लालाजी शहा यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, शेजारी राहणारा व्यक्ती कोणतेही कारण नसताना वारंवार अपमानास्पद भाषा वापरत होता. रविवारी सायंकाळी झालेल्या प्रकारानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. याप्रकरणी नाझीम इस्माईल शेख यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून महिला पोलीस हवालदार माने तपास करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
म्हसवे परिसरात संशयास्पद फिरणारा युवक ताब्यात; घरफोडीची साधने जप्त
पुढील बातमी
बसप्पाचीवाडीत वादाचे रूपांतर हाणामारीत; दोन जणांवर सातारा तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा

संबंधित बातम्या