सातारा : सातारा शहरासह तालुक्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढल्याने कायदा व सुव्यवस्था बिघडली आहे. खुलेआम गांजा, गुटखा विक्रीमुळे युवक नशेच्या आहारी जात आहेत. चोऱ्या, घरफोड्यांचे प्रमाण वाढलेअसून युवकांमध्ये मारामाऱ्या होत असून अशा घटनांमुळेबिघडत चाललेले सामाजिक स्वास्थ सुधारण्यासाठी पोलीस दलाने पुढाकार घेवून वाढत्या गुन्हेगारीला लगाम घालावा, अशी मागणी दलित महासंघाचे अध्यक्ष उमेश चव्हाण यांनी केली.
याबाबत उमेश चव्हाण व पदाधिकाऱ्यांनी साताऱ्याचे नूतन उपविभागीय पोलीस अधिकारी सूरज गुरव यांची भेट घेवून त्यांना निवेदन दिले. यावेळी चव्हाण यांनी लोकशाहीर अण्णाभा ऊ साठे यांची फकिरा कांदबरी भेट देवून फकिराप्रमाणे गोरगरिबांना न्याय देण्याचे काम पोलीसांनी करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.।
निवेदनात म्हटले आहे की, गेल्या काही वर्षांमध्ये पोलिसांचा धाक कमी झाल्याने सातारा शहरासह तालुक्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढत चाललेआहे. त्यावर उपाय योजना करण्यासाठी पोलीस दलाने काम केले असले तरी फरक दिसून येत नाही. कॉलेज युवती, महिला असुरक्षित वातावरण अनुभवत आहेत. रात्रगस्त बंद असल्यात जमा आहे. दामिनी पथक नावापुरते स्थापन केले की असा प्रश्न जनतेला पडत आहे. मटक्यासह अवैध दारुविक्री, अंमली पदार्थांची विक्री होत आहे. यामुळे सामाजिक जीवनात अशांतता निर्माण होत असून अशा वेळी पोलिसांचा धाक निर्माण होण्यासारख्या कारवाया जनतेला अपेक्षित आहेत. याबाबत उपाय योजना कराव्यात, अशी मागणी आहे.
साताऱ्यातील वाढत्या गुन्हेगारीला लगाम घाला - उमेश चव्हाण, दलित महासंघातर्फेउपविभागीय पोलीस अधिकारी सूरज गुरव यांना निवेदन
by Team Satara Today | published on : 17 November 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा