सातारा : पाण्यात बुडल्याने विवाहितेचा मृत्यू झाल्याची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 27 रोजी रितू कुमारी बबलू पासवान रा. असेय, कदलीपट्टी, सहरसा, राज्य बिहार. सध्या रा. लिंब, ता. सातारा ही विवाहिता बेपत्ता झाली होती. दि. 30 रोजी सहा वाजण्याच्या सुमारास विहिरीत बुडून तिचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. अधिक तपास पोलीस हवालदार कुमठेकर करीत आहेत.