बुद्धिबळ विश्वचषक भारतात आला, हा सर्वांत मोठा आनंद : दिव्या देशमुख

by Team Satara Today | published on : 02 August 2025


नवी दिल्ली : 'माझ्या दृष्टीने सर्वात आनंदाची बाब म्हणजे फिडे विश्वचषक हा किताब भारतात आला. कोनेरूने अतिशय सुरेख खेळ केला; पण मी नशीबवान होते की मी जिंकले. विजेती कोणीही असो, किताब भारतात येणार हेच माझ्यासाठी खूप आनंददायी होते,' असे मत विश्वविजेती बुद्धिबळपटू दिव्या देशमुख हिने शुक्रवारी व्यक्त केले. केंद्रीय क्रीडामंत्री डॉ. मनसुख मांडवीया यांच्या हस्ते दिव्याला सन्मानित करण्यात आले.

फिडे महिला विश्वचषक जिंकणारी नागपूरची १९ वर्षाची बुद्धिबळपटू दिव्या देशमुख हिने सोमवारी जॉर्जियातील बटुमी येथे वरिष्ठ सहकारी कोनेरू हम्पीला पराभूत करत सर्वात लहान वयाची विजेती होण्याचा मान मिळविला. सत्काराला उत्तर देताना दिव्या म्हणाली, 'माननीय मंत्र्यांकडून सन्मानित होणे खूप प्रेरणादायी वाटते; कारण यामुळे खेळाडूंना प्रोत्साहन मिळते; शिवाय देश आपल्या पाठीशी आहे, असा विश्वास तरुणांना मिळतो.'

मांडवीया म्हणाले, 'महिला विश्वचषकातील भारताची विजयी कामगिरी देशाच्या क्रीडाशक्तीचे प्रतीक आहे. तुमच्यासारखे ग्रँडमास्टर्स पुढच्या पिढीसाठी प्रेरणा ठरतील.' मांडवीया यांनी हम्पीच्या योगदानाचाही गौरव केला.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
किडनी फेल, डायबिटीस... अन् 172 आजारांना निमंत्रण

संबंधित बातम्या