झेडपीसमोर युवाशक्ती ग्रामविकास संघटनेचे धरणे-आंदोलन सुरू !

by Team Satara Today | published on : 26 August 2024


सातारा : ग्रामसेवकांना बायोमॅट्रिक प्रणाली जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सुरु करावी, या मागणीसाठी सातारा जिल्हा परिषद समोर महाराष्ट्र राज्य युवाशक्ती ग्रामविकास संघटनेच्यावतीने आंदोलन सुरू करण्यात आले आहे, अशी माहिती संस्थापक अध्यक्ष इमरानभाई पठाण, जिल्हाध्यक्ष सुनील कदम यांनी दिली. दरम्यान, महाराष्ट्र राज्य या ग्रामविकासाशी निगडीत काम करत असलेल्या संघटनेच्यावतीने दि.6 जून 2023 रोजी संपूर्ण राज्यभर प्रत्येक जिल्हा परिषद समोर आंदोलन करून ग्रामसेवकांना बायोमॅट्रिक प्रणाली लागू करावी, अशा आशयाचे निवेदन संबंधितांना देण्यात आलेले होते.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मंत्रालय स्तरावरून या मागणीची दखल घेऊन ग्रामविकास विभागाने दि.24 ऑगस्ट 2023 रोजी सर्व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पत्र काढून ग्रामसेवकांना बायोमॅट्रीक प्रणाली लागू करावी, असे पत्र काढले होते. परंतु एक वर्ष पुर्ण होत आहे. तरीही सातारा जिल्हा परिषद कार्यकारी अधिकारी यांनी ग्रामसेवकांना सातारा जिल्ह्यात बायोमॅट्रीक प्रणाली लागू केलेली दिसून येत नाही, म्हणजेच मंत्रालयीन आदेशाला केराची टोपली दाखवण्याचे काम केले आहे की काय ? असा सवाल उपस्थित करत या वर्षपूर्तीच्या निमित्ताने झोपलेल्या प्रशासनाला जाग आणण्यासाठी धरणे आंदोलन होत आहे. तेव्हा ग्रामसेवकांना बायोमॅट्रिक प्रणाली तात्काळ लागू करावी. तसेच ई ग्रामस्वराज अँप वर महिना संपल्यानंतर 30 दिवसाच्या आत ग्रामपंचायतीची सर्व आर्थिक माहीती सक्तीने पुर्ण भरली जावी. या मागणीकरता बायोमॅट्रीक प्रणाली आदेश वर्षपुर्ती सोहळा संबंधित अधिकारी यांचे अनोख्या पद्धतीने स्वागत करून अंतीम चर्चा करण्यात येणार आहे, अशी माहिती कदम यांनी दिली. यावेळी ऍड. विलास वहागावकर, अनिल वीर, विनोद ननावरे आदी उपस्थित होते.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातारा पोलीसांचा महिला सुरक्षेसाठी अभया उपक्रम
पुढील बातमी
भिमाई आंबेडकर स्मारकराचे काम गतीने करा

संबंधित बातम्या