कोंडवे ते शाहूपुरी जाणाऱ्या रस्त्यावर अपघात प्रकरणी एकावर गुन्हा

by Team Satara Today | published on : 03 September 2026


सातारा : दुचाकी अपघात प्रकरणी एका विरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 31 रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास सातारा तालुक्यातील एक युवती कोंडवे ते शाहूपुरी जाणाऱ्या रस्त्यावर गाडी कडेला लावून तोंडाला स्कार्फ बांधत होती. त्याचवेळी अचानक पाठीमागून येणाऱ्या मोटरसायकल (क्र. एमएच 11 सीएक्स 2119) वरील चालक संजय यदु चोरगे (रा. चोरगेवाडी, ता. सातारा) यांनी त्यांच्या ताब्यातील दुचाकी भरधाव वेगाने चालवून संबंधित युवतीच्या मोटरसायकलला पाठीमागून धडक देऊन अपघात केला. या अपघातामध्ये युवती किरकोळ जखमी झाली असून चोरगे यांचा मृत्यू झाला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
विवाहितेवर अत्याचार केल्याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा
पुढील बातमी
एकाच्या फ्लॅटमध्ये अनाधिकृतपणे प्रवेश केल्याप्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा

संबंधित बातम्या