अवैधरित्या पिस्टल बाळगल्याप्रकरणी तीनजणांना अटक

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; गावठी पिस्टल, जिवंत काडतूस असा एक लाख 80 हजाराचा मुद्देमाल जप्त

by Team Satara Today | published on : 16 July 2025


सातारा : पिस्तूल विक्रीसाठी वाढे फाटा तालुका सातारा येथे आलेल्या पोलिसांच्या रेकॉर्डवरील तीन गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करून ताब्यात घेतले. त्यांच्याकडून तीन मोबाईल हँडसेट, जिवंत काडतूस, देशी बनावटी चे पिस्तूल व एक मोटर सायकल असा एक लाख ऐंशी हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई मंगळवारी दुपारच्या दरम्यान करण्यात आली. 

ओम बापूराव महानवर राहणार साखरवाडी तालुका फलटण, श्रेयस शरद खताळ रा. कापडगाव ता फलटण जि सातारा, 

आकाश संतोष नरुटे रा कळंब ता इंदापूर जि पुणे या तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे. 

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना काही इसम वाढे फाटा येथे पिस्तूलाची विक्री करण्यासाठी येणार आहेत, अशी खात्रीशीर माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे, परितोष दातीर, पोलीस अंमलदार आतिश घाडगे, संतोष सपकाळ, विजय कांबळे, संजय शिर्के यांचे पथक तैनात केले. पोलिसांनी येथे दोन संशयित इसमांना त्यांच्या हालचालीवरून तत्काळ ताब्यात घेतले. त्यांच्याकडे पिस्तुलासह काडतुसाचा मुद्देमाल आढळून आला. संबंधितांच्या विरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात भारतीय शस्त्र अधिनियम कलम 3, 7 व 25 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

या कारवाईत प्रवीण कांबळे, सनी आवटे, अमोल माने, अजित कर्णे, मुनीर मुल्ला, राजू कांबळे, अरुण पाटील, मनोज जाधव, शिवाजी भिसे, राकेश खांडके, अमित झेंडे, रवी वर्णेकर, वैभव सावंत, स्वप्निल दौंड, संकेत निकम यांनी सहभाग घेतला. 


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
प्रदेशाध्यक्ष आ.शशिकांत शिंदे यांच्या स्वागतासाठी आज बैठक
पुढील बातमी
राहत्या घरातून एकजण बेपत्ता

संबंधित बातम्या