वेण्णा नदीच्या पुलावरून पडल्याने युवकाचा मृत्यू

by Team Satara Today | published on : 03 June 2026


सातारा : शहरालगत महामार्गावर असलेल्या वेण्णा नदीच्या पुलावरुन पडल्याने बिरुदेव भाऊ बिडे (वय 22, मूळ रा. बचेरी, ता. माळशिरस जि. सोलापूर) या युवकाचा मृत्यू झाला. ही घटना दि. 2 जून रोजी घडली आहे. दरम्यान, तो युवक पोलीस भरतीसाठी सातार्‍यातील अकॅडमीमध्ये सराव करत होता.

याबाबत प्राथमिक माहिती अशी, बिरुदेव बिडे हा पुलावरुन पडल्यानंतर गंभीर जखमी झाला. त्याने मित्राला त्याचे मोबाईलवरुन लोकेशन पाठवले. त्यानुसार मित्रांनी त्याला तेथून उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी घटनास्थळी व रुग्णालयात भेट दिली. घटनेचे नेमके कारण अद्याप समोर आले नसून पोलीस तपास करत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
बैलाचे स्टेटस ठेवल्याच्या कारणावरून खुनाच्या प्रयत्नासह मारहाणप्रकरणी बोरगाव पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे
पुढील बातमी
राधिका रोड परिसरात युवतीच्या विनयभंग प्रकरणी एकावर गुन्हा

संबंधित बातम्या