लाडकी बहीण योजनेमुळे सरकारी तिरोजीवर ताण : कृषीमंत्री कोकाटे

by Team Satara Today | published on : 07 April 2025


मुंबई : राज्य सरकारची लाडकी बहीण योजना ही देशभरात चर्चेचा विषय बनलेली आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील पात्र महिलाना दरमहा 1500 रुपये दिले जातात. महायुती सरकारच्या विजयात या योजनेचा मोठा हात असल्याचे बोलले जात आहे. मात्र या योजनेमुळे राज्य सरकाच्या तिजोरीवरील ताण वाढला आहे. त्यामुळे इतर योजनांना निधी कमी पडत आहे. त्यामुळे काही योजना बंद होण्याच्या मार्गावर आहेत. यावर आता कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी महत्वाचे विधान केले आहे.

कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे नंदुरबार दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांनी अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतीची पाहणी केली. या दौऱ्यात त्यांनी राज्य सरकारची लोकप्रिय असलेल्या लाडक्या बहीण योजनेवरही भाष्य केले आहे. त्यांनी म्हटले की, "लाडकी बहीण योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर ताण पडला आहे, मात्र त्यामुळे बाकीच्या योजना बंदी पडतील असं काही होणार नाही." कोकाटे यांच्या या विधानामुळे इतर योजनांच्या लाभार्थ्ंयांना दिलासा मिळाला आहे.

लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत आतापर्यंत एकूण नऊ हप्त्यांचे एकूण 13,500 रुपये (जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च) लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात जमा झाले आहेत. आता 10वा हप्ता एप्रिल महिन्यात मिळणार आहे. पण एप्रिल महिन्याचा हप्ता नेमका कधी खात्यात जमा होणार? याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाहीये. मात्र लवकरच लाडक्या बहिणींना गुड न्यूज मिळणार आहे.

लाडकी बहीण योजनेला सुरुवात झाल्यानंतर राज्यातील सर्वच उत्पन्न गटातील महिलांनी यासाठी अर्ज केला होता. सुरुवातीला सर्व महिलांना या योजनेचा लाभ देण्यात आला होता. मात्र आता या योजनेतील महिलांच्या अर्जाची छानणी केली जात आहे. अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन असलेल्या महिलांना या योजनेतून वगळण्यात आले आहे. तसेच ज्या महिलांच्या घरात चारचाकी वाहन आहे अशा महिलांनाही अपात्र करण्यात आले आहे. 


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
दूध भेसळ रोखण्यासाठी नवीन कायदा !
पुढील बातमी
कुणाल कामराने ठोठावले मुंबई उच्च न्यायालयाचे दार

संबंधित बातम्या