सातारा : सातारा विधानसभा मतदारसंघांमध्ये सातारा व जावळी या कार्यक्षेत्रामध्ये या क्षेत्रातील गुणवंत खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचता यावे यासाठी ऑलम्पिक खेळांचा समावेश असणारे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्टेडियम उभारण्यात यावे, अशी मागणी ठाकरे (उबाठा) गटाच्या वतीने जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली आहे. शिवसेनेचे जिल्हा उपसंघटक सादिक बागवान आणि त्यांच्या सहकार्यांनी याबद्दलचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांना सादर केले.
यावेळी जिल्हाधिकार्यांशी चर्चा करताना सादिक बागवान म्हणाले, जर कराड सारख्या तालुक्याला मागणी न करता स्टेडियम साठी 75 कोटीचा निधी येऊ शकतो तर सातारा शहरांमध्ये सुद्धा एक स्टेडियम आहे, त्याची दुरुस्ती मात्र होऊ शकत नाही. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा सातारा मतदारसंघात मिळत नसल्यामुळे येथे गुणवंत खेळाडू मागे पडतात. राधिका रोडवरील शेती फार्म शाळेसमोरील मोकळ्या जागेमध्ये आंतरराष्ट्रीय खेळांचा समावेश असणारे आणि सुविधांनीयुक्त असे स्टेडियम उभारले जाऊ शकते. त्यामुळे येथील नियोजित प्रांत व तहसीलदार कार्यालय अन्यत्र हलवावे.
जर राज्य शासनाने प्रगल्भ क्रिडा धोरणाचा स्वीकार केला आहे तर सुविधांच्या बाबतीमध्ये सातारा मागे का ? असा प्रश्न निवेदनात विचारण्यात आला आहे. यासंदर्भात निवेदन सादर केल्यानंतर सादिक बागवान यांनी पत्रकारांशी संवाद साधत याबाबत येत्या 15 सप्टेंबर पर्यंत जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून राज्य शासनाने आदेश द्यावेत अन्यथा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्टेडियमच्या मागणीसाठी ठाकरे गटाच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा बागवान यांनी दिला आहे.
सातारा शहरात आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्टेडियम उभारावे
शिवसेना उबाठा गटाचे जिल्हा प्रशासनाला निवेदन
by Team Satara Today | published on : 29 August 2024

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा