विकासकामांना निधी कमी पडू देणार नाही : ‎मंत्री मकरंद पाटील

by Team Satara Today | published on : 22 August 2025


वाई : "प्रत्येक वेळी तुम्ही माझ्या मागे मोठे पाठबळ उभे केले. यामुळे तुमच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, तुमच्या भागाच्या आवश्यक विकास कामांना निधीची कमतरता भासू देणार नाही", असा शब्द मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी दिला.

‎‎यशवंतनगर ग्रामपंचायत अंतर्गत अंगणवाडी इमारत,  घंटागाडी, वॉटर एटीएम आदी विविध विकासकामांच्या लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते. या यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस प्रतापराव पवार, माजी नगराध्यक्ष रमेश गायकवाड, किसनवीर कारखान्याचे संचालक दिलीप पिसाळ, सरपंच मेघा सावंत आदींची प्रमुख उपस्थिती होती.

‎‎मंत्री मकरंद पाटील म्हणाले, "शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचारांवर आणि आदरणीय यशवंतराव चव्हाण व किसन वीरांनी घालून दिलेल्या आदर्शाचे पालन करीत गोरगरीब, कष्टकरी वंचितांसाठी राज्य सरकार काम करत आहे.  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मी स्वतः मतदारसंघालाला विकासाच्या मार्गावर घेऊन जात आहोत".

‎‎या कार्यक्रमास मदन भोसले, शामराव शिंदे, विक्रांत डोंगरे, अनिल सावंत, नारायण जाधव, सचिन सावंत बाळासाहेब चिरगुटे , चंद्रकांत सावंत, डॉ. भोसले, सुनील सावंत, सुनील शिंगटे, सुरेश सावंत, सदाभाऊ कोळेकर  ग्रामस्थ व महिला मोठया संख्येने उपस्थित होत्या. अशोक येवले यांनी सूत्रसंचालन केले. उपसरपंच शामराव गाडे यांनी आभार मानले.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
अनाधिकृतपणे फ्लेक्स लावल्या प्रकरणी 12 जणांवर गुन्हा
पुढील बातमी
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना टोलमाफी

संबंधित बातम्या