विभागीय अधिस्विकृती समितीच्या बैठकीत दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली

by Team Satara Today | published on : 05 March 2026


पुणे   :  विभागीय अधिस्विकृती समितीच्या बैठकीत दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

पुणे विभागीय अधीस्वीकृति  समितीचे अध्यक्ष हरीश पाटणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार आणि माध्यम क्षेत्रासाठी केलेल्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. त्यांच्या कार्याची आठवण करून देत उपस्थित सदस्यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.

यावेळी समितीचे सदस्य सचिव तथा विभागीय उपसंचालक डॉ. किरण मोघे, सदस्य ज्येष्ठ पत्रकार सुनीत भावे, गोरख तावरे, चंद्रशेन जाधव, पुणे जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील, सोलापूर जिल्हा माहिती अधिकारी सुनील सोनटक्के तसेच सातारा जिल्हा माहिती अधिकारी वर्षा पाटोळे उपस्थित होते.

बैठकीच्या प्रारंभी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दोन मिनिटे मौन पाळून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातारा शहराच्या विकास आराखड्यामध्ये गंभीर त्रुटी; नगरसेविका मुक्ता लेवे यांचे नगरपालिकेला पत्र :आरक्षणे लोकसंख्येच्या व्यस्त प्रमाणात
पुढील बातमी
भूजल माहिती भंडार व जलधर नकाशाकरण अभ्यास प्रकल्पांचे उपयोग विषयावरील कार्यशाळा संपन्न

संबंधित बातम्या