सातारा : आयशर टेम्पोच्या धडकेत दुचाकीवरील महिला जखमी झाल्याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कोडोली येथे आयशर व दुचाकीचा अपघात होवून दुचाकीवरील महिला जखमी झाली. लक्ष्मी अजित मोरे (वय 36, रा. दुदुस्करवाडी ता.जावली) असे जखमी महिलेचे नाव आहे. याप्रकरणी आयशर टेम्पो चालक सचिन सपकाळ (रा.शिवथर ता.सातारा) याच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. हा अपघात 15 मे रोजी झाला आहे.