बिग बॉसच्या घरात निक्कीचा अरबाजला होतोय त्रास! 

डीपी दादांनी दिला अरबाजला सल्ला

by Team Satara Today | published on : 27 August 2024


मुंबई : बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनमध्ये रविवारी अनेक समीकरणं बदललेली पाहायला मिळाली. रितेशभाऊंनी चक्रVIEW रुममध्ये तिच्यामागे घरातील सदस्य काय बोलतात हे दाखवलं. त्यामध्ये छोटा पुढारी, अरबाज, जान्हवी, वैभव या सर्वांच्या किल्प्स निक्कीला पाहायला मिळाल्या. त्या क्षणापासून निक्की A ग्रुपमधील कोणाशीही बोलत नाहीय. निक्कीशी चांगली मैत्री झालेला अरबाजला तिच्या वागण्याचा त्रास होतोय.

निक्कीचा जो त्रास होतोय त्या विषयावरूनच अरबाज, वैभव DP दादांशी बोलताना दिसत आहे. बिग बॉसच्या नव्या प्रोमोत तूम्ही पाहू शकता की, अरबाज DP दादांना म्हणत आहे की," मला कंट्रोल नाही होत आता. मी कॅप्टनसी रूम सोडून बाहेर जात होतो झोपायला. बाथरूम साफ करत होतो, झाडू मारत होतो. ती मला म्हणते की, माझ्या कॅप्टनसीच्या रूममध्ये येऊ नकोस. माझ्या कॅप्टनसीवर अडथळा निर्माण होऊ शकतो."

अरबाज पुढे म्हणाला, "मला दुसऱ्या कोणत्या गोष्टीचा त्रास नाही होत पण, जे माझ्या समोर घडत आहे ना त्याचा होत आहे आणि ती ते मुद्दामहून करत आहे."  यावर DP दादा म्हणतात की," तू सोड यावर लक्ष देऊ नको." अशाप्रकारे वैभव आणि DP अरबाजला समजावताना दिसले. आज बिग बॉसच्या घरात निक्कीच्या याच वागण्याने अरबाज घरात तोडफोड करताना दिसणार आहे. त्यामुळे आजच्या भागात मोठा राडा बघायला मिळेल.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
भारत-चीनच्या युद्धनौका आल्या आमने-सामने
पुढील बातमी
उद्योगक्षेत्राने राष्ट्रीय शिकाऊ प्रशिक्षण योजनेचा लाभ घ्यावा : पी.एन. जुमले

संबंधित बातम्या