मोबाईल व्यावसायिकांचा वाद शहर पोलीस ठाण्यात; नीलेश मोरे यांची मध्यस्थी : स्थानिकांना मिळाला न्याय

by Team Satara Today | published on : 10 December 2025


सातारा :  सातारा शहर व परिसरात मोबाईलचे पार्ट होलसेल दरात विक्री करणारे परप्रांतीय आणि स्थानिक भुमिपुत्र यांच्यात मंगळवारी रात्री वाद झाला. हा वाद सातारा शहर पोलीस ठाण्यात पोहोचला तर मोबाईल असोसिएशनचे निलेश मोरे यांच्या मदतीने हा वाद मिटवला गेला. पोलीस निरीक्षक यांनी भूमिपुत्र यांच्या बाजूने निर्णय देत परप्रांतीयांना समज दिला.

सातारा शहर व परिसरात मोजकेच मोबाइलचे पार्ट होलसेल दरात विक्री करणारे परप्रांतीय आहेत. हे लोक रिटेल दरातही मोबाईलचे पार्ट विक्री करत असल्याने स्थानिक मोबाइल व्यावसायिकांना अडचणी येत आहेत. त्यांचा व्यवसायाला फटका बसत आहे. याबाबत या परप्रांतीय व्यावसायिकांना स्थानिकांकडून सूचना व समज देण्यात आल्या. मात्र यावर त्यांनी दुर्लक्ष करत व्यवसाय सुरू ठेवला. मंगळवारी सायंकाळी याबाबत तक्रारी वाढू लागल्याने सातारा मोबाइल असोसिएशनचे पदाधिकारी आक्रमक झाले. त्यांनी या परप्रांतीय व्यावसायिकांना धारेवर धरले. यावर तणाव निर्माण झाला. रात्री हे प्रकरण शहर पोलीस ठाण्यापर्यंत गेले.

यावेळी असोसिएशनचे संस्थापक नीलेश मोरे व शहर पोलीस निरीक्षक राजेंद्र म्हस्के यांनी याबाबत चर्चा करून दोघांच्या बाजू समजून घेतल्या. त्यावर रिटेल व्यावसायिकांनी रिटेलच विक्री करावी अशा सूचना परप्रांतीय व्यावसायिक यांना देण्यात आले. यानंतर पोलीस ठाण्यासमोरील तणाव शांत झाला. यावेळी सातारा मोबाईइल असोसिएशन संस्थापक नीलेश मोरे, अध्यक्ष सचिन साळुंखे, उपाध्यक्ष समीर शेख, खजिनदार आकाश जैन आदी उपस्थित होते.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
पोवई नाक्‍यावरील ग्रेड सेपरेटरच्या डक्टमध्ये पडून मनोरुग्ण जखमी; अग्निशमन दलाच्या सहकार्याने सुटका, परिसरात बघ्यांची गर्दी उसळली
पुढील बातमी
डॉक्टरांशिवाय तपासण्या करणार्‍या लॅबचा पर्दाफाश; कराडमधील प्रकार; मुंबई, पुणे, कोल्हापूरच्या 17 जणांवर गुन्हा

संबंधित बातम्या