सातारा : येथील संबोधी प्रतिष्ठानतर्फे पाठक हॉलमध्ये महात्मा ज्योतिबा फुले स्मृतिदिनापासून दररोज थोरांच्या स्मृती व्याख्यानमाला सुरू करण्यात आली आहे. त्याची सांगता डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणपर्यंत चालणार आहेत.
म.फुले स्मृतिदिनानिमित, "भारतीय राष्ट्रवाद व संविधान" या विषयावर ज्येष्ट विचारवंत किशोर बेडकिहाळ यांचे व्याख्यान झाले.प्रथमतः महापुरुष यांच्या प्रतिमांना पुष्पहार बेडकिहाळ यांच्या हस्ते प्रदान करून अभिवादन करण्यात आले.बबन उथळे यांच्या निधनाबद्धल श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यानंतर डॉ.नितीश नवसागरे यांचे ,"एक देश, एक निवडणूक व संविधान" या विषयावर व्याख्यान होणार आहे. शनिवार दि.३० रोजी, "मूलभूत हक्क व संविधान" या विषयावर डॉ. श्रीरंजन आवटे यांचे व्याख्यान होणार आहे. रविवार दि.१ डिसेंबर रोजी सकाळी ११ वा.मातोश्री भीमाबाई आंबेडकर पुरस्कार मंगल खिवसरा यांना डॉ.राजेंद्र मोरे यांच्या प्रदान सोहळा होणार आहे. मंगळवार दि.३ डिसेंबर रोजी, "राष्ट्रवाद, अल्पसंख्याक व संविधान" या विषयावर अन्वर राजन यांचे व्याख्यान होणार आहे. बुधवार दि.४ रोजी, "संविधान दुरुस्ती व न्यायव्यवस्था" या विषयावर डॉ.शिवाजीराव पाटील यांचे व्याख्यान होणार आहे. गुरुवार दि.५ रोजी, "भारतीय संघराज्याची वाटचाल व संविधान" या विषयावर डॉ.अशोक चौसाळकर यांचे व्याख्यान होणार आहे. शुक्रवार दि.६ रोजी महापरिनिर्वाण दिनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने सांगता होणार आहे. तेव्हा सदरच्या व्याख्यानांचा लाभ समाजातील विविध घटकांनी घ्यावा. असे आवाहन संयोजकांनी केले आहे. याकामी, अध्यक्ष दिनकर झिंब्रे,उपाध्यक्ष रमेश इंजे, कार्यवाह ऍड.हौसेराव धुमाळ, पदाधिकारी व विश्वस्त अथक असे परिश्रम घेत आहेत.