हुंडाबळीप्रकरणी सातारा शहर पोलिसांत चौघांविरुध्द गुन्हा दाखल

by Team Satara Today | published on : 15 April 2026


सातारा : विकासनगर (ता. सातारा) येथे भाड्याने रहावयास असणाऱ्या कुटूंबातील विवाहितेच्या मृत्यूप्रकरणी तिच्या सासरच्या मंडळींविरुध्द हुंडाबळी व घातपातप्रकरणी पुळकोटी (ता. माण, जि. सातारा) येथील चौघांविरुध्द सातारा शहर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. राजकुमार, सासू सुनंदा लालासो कांबळे, मामे बहिण सानिक बनसोडे व अविवाहीत नणंद (सर्व रा. पुळकोटी, ता. माण) यांच्याविरुध्द याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. 

संजय मोटे (रा. पांढरेवाडी, ता. आटपाडी, जि. सांगली) यांनी याबाबत पोलिसांत तक्रार दिली आहे. फिर्यादीची मुलगी भाग्यश्री मोटे हिचा ३० मार्च रोजी राजकुमार कांबळे याच्यासोबत लग्न झाले होते. तेव्हापासून सासरकडील मंडळी पाच लाख रुपये हुंडा व सोन्याचे दागिने दिले नाहीत म्हणून मुलीचा छळ करीत होते तसेच त्यातूनच त्यांनी आपल्या मुलीला त्रास देऊन तिचा घातपात केला असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पो. कॉ. तारडे हे या घटनेचा अधिक तपास करत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
फलटण तालुक्यातील आनंदनगर येथून दुचाकीची चोरी
पुढील बातमी
नेले येथील मारहाणप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल; शेतजमिनीच्या वहिवाटीच्या कारणावरुन वाद

संबंधित बातम्या