सातारा : भाजलेल्या जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, विजय पांडुरंग जाधव (रा. निगडी तर्फ, सातारा) हे घरात कपड्यांनी पेट घेतल्याने भाजले होते. त्यांच्यावर पुणे येथे उपचार सुरू असताना उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. याबाबतची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास पोलीस हवालदार पिसाळ करीत आहेत.
निगडी येथील भाजलेल्या जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू
by Team Satara Today | published on : 15 November 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा