सुमारे साडेतीन कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी बोरगाव पोलीस ठाण्यात ममता डेअरीच्या सात संचालकांवर गुन्हा

by Team Satara Today | published on : 17 August 2026


सातारा : दूध व बर्फ पुरवठादारांची सुमारे साडेतीन कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी सात संचालकांविरोधात बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, 2021 ते 16 ऑगस्टपर्यंत बोरगाव, ता. सातारा येथील ममता मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट प्रायव्हेट लिमिटेड बोरगाव डेअरीचे संचालक सचिन सोपानराव साळुंखे, दीपक सोपानराव साळुंखे, संजय बाळकृष्ण साळुंखे (सर्व रा. बोरगाव, ता. सातारा), स्वाती मारुती जाधव, प्रतिभा प्रताप जाधव, मारुती रघुनाथ जाधव, प्रताप रघुनाथ जाधव (सर्व रा. इंदोली, ता. कराड) यांनी 16 दुध पुरवठादार आणि बर्फ लादी पुरवणाऱ्यांचे तीन कोटी 68 लाख 52 हजार 859 रुपये बिल न देता त्यांचा विश्वासघात करून आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी तसेच त्यांना धमकी दिल्या प्रकरणी संबंधितांविरोधात बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कारळे करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
बजावलेल्या नोटिसीप्रमाणे ‘हॉटेल वसंत भोजनालय’वर तातडीने कारवाई करावी; शिवसेनेचे शहर संघटक किरण कांबळे यांची नगरपरिषदेकडे मागणी
पुढील बातमी
सातारा-कराड महामार्गावर रस्त्याकडेला पार्क केलेल्या दुचाकीची चोरी

संबंधित बातम्या