जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दिमतीला आता ९ नव्या गाड्या दाखल; कामकाज अधिक गतिमान होण्यास मदत होणार

by Team Satara Today | published on : 07 November 2026


सातारा : जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दिमतीला आता ९ नव्या गाड्या दाखल झाल्या आहेत. या नवीन गाड्यामुळे प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान होण्यास मदत होणार आहे. अधिकारी व पदाधिकाऱ्यांचे तालुका व गावपातळीवर दौरे वाढणार आहेत.
सातारा जिल्हा परिषदेचे महिला, समाजकल्याण, कृषि, शिक्षण व अर्थ समिती सभापतीं, खंडाळा, कोरेगाव पंचायत समित्यांचे सभापती व गटविकास अधिकारी, जावली पं.स.चे गटविकास अधिकाऱ्यांची वाहने जुनी झाली होती. तसेच या वाहनांनी किलोमीटरची मर्यादाही ओलांडली होती. त्यामुळे ही वाहने कुठेही बंद पडत होती. त्यामुळे प्रशासनाने ही वाहने निर्लेखीत केली.
त्यानंतर ही वाहने खरेदी करण्यासाठी शासनाकडे जिल्हा परिषद प्रशासनामार्फत प्रस्ताव पाठवण्यात आला होता. त्यास शासनाने मंजुरी दिल्यानंतर जिल्हा परिषद प्रशासनाने कोट्यवधी रूपयांच्‍या ९ नव्या स्कार्पिओ खरेदी करण्यात आल्‍या. त्यानंतर या वाहनांच्या चाव्या संबंधित पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या विषय समित्यांचे सभापती, गटविकास अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. जिल्हा परिषदेत शुक्रवारी वाहनांचे प्रातिनिधीक स्वरूपात पूजन करून वाहने त्या त्या पदाधिकाऱ्यासह अधिकाऱ्यांच्या ताब्यात प्रशासनामार्फत देण्यात आली.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगतील तोच जिल्हा बँकेचा चेअरमन : ना. जयकुमार गोरे, चेअरमन निवडताना महायुतीतील सर्व घटक पक्षांना विश्‍वासात घेतले जाईल
पुढील बातमी
बेळगावात सरसेनापती तळबीडचे सुपुत्र हंबीरराव मोहिते यांचा अश्वारुढ पुतळा विराजमान! ‘मराठा लाईट इन्फन्ट्री'त पुतळ्याचे अनावरण

संबंधित बातम्या