सातारा : यशवंतराव चव्हाण शासकीय कृषी महाविद्यालय कराड येथील कृषीकन्या ग्रामीण भागात प्रत्यक्ष वास्तव्य करुन शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा प्रसार करत शेतामध्ये ते कसे वापरावे याची माहिती शेतकर्यांना दिली जाणार आहे. शेतकर्यांनी याचा फायदा घ्यावा, असे आवाहन महाविद्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे.
महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत यशवंतराव चव्हाण शासकीय कृषी महाविद्यालय कराड येथील ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रम व कृषी औद्योगिक संलग्नता कार्यक्रमांतर्गत हा उपक्रम आहे. फुले समृद्ध गाव येडेनिपाणी (ता. वाळवा) येथे हा उपक्रम पार पडणार असून कृषीकन्यांनी नुकतीच गावाला भेट देखील दिली आहे.
कृषिकन्या या कालावधीत गावातील शेतकऱ्यांसाठी विविध कृषी प्रात्यक्षिके देणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने मृदा परीक्षण, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन, एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन, कृषी योजनांची माहिती, शेतकरी जनजागृती तसेच विविध कृषिविषयक उपक्रम राबवले जाणार आहेत. यामाध्यमातून विद्यार्थ्यांना देखील ग्रामीण जीवनाचा प्रत्यक्ष अनुभव मिळणार असून शेतकऱ्यांनाही आधुनिक शेती तंत्रज्ञानाची माहिती सहज सोप्या पध्दतीने मिळणार आहे. येडेनिपाणी परिसरातील शेतकर्यांनी कृषीकन्यांकडून माहिती घ्यावी, असे आवाहन देखील करण्यात आले आहे.
येडेनिपाणी येथे कृषीकन्यांनी भेट दिली असून सरपंच सौ. शामबाला माळी, अमर पाटील, सचिन शेवाळे, शिवानंद पाटील यांनी त्यांचे स्वागत व सत्कार केला. या उपक्रमासाठी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे, शिक्षण संचालक डॉ. साताप्पा खरबडे, महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संग्राम धुमाळ, केंद्रप्रमुख डॉ. राजगुरू, कार्यक्रम समन्वयक डॉ. योगेश कांदळकर, अधिष्ठाता प्रतिनिधी डॉ. उमराव बोंदर, कार्यक्रम अधिकारी डॉ. धनंजय नावडकर व डॉ. कल्याणी राऊत यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.
या कार्यक्रमात सहभागी कृषिकन्या साक्षी पाटील, सृष्टी डुणू्ंग, सायली जोपळे, प्रतिक्षा लोकरे, ऐश्वर्या निकम, शिरीन पठाण, रसिका पवार, वैष्णवी सावंत, प्रणाली शिंदे, ओमश्री शिंगाडे, मधुरा वाळके, वेदिका देसाई, नेहा कुरुंद, अर्पिता राऊत या सहभागी होणार आहेत
कराड येथील कृषीकन्या शेतकऱ्यांना देणार तंत्रज्ञानाचे धडे; ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत येडेनिपाणी गावाला भेट
by Team Satara Today | published on : 06 November 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा