सातारा  : सातारा जिल्ह्यातील महिलांच्या तक्रारी निवारणा संदर्भात महिलांमध्ये जागरूकता वाढत आहे ही समाधानाची बाब आहे 2025 मध्ये महिलांच्या संदर्भातील 103 तक्रारी राज्य महिला आयोगाला प्राप्त झाल्या असून त्यात सर्व तक्रारींचा जागेवर निपटारा करण्यात आल्या आहे अशी माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी दिली. 
राज्य महिला आयोगाच्या मार्फत सातारा जिल्हा मध्ये महिला आयोग आपल्या दारी हा उपक्रम राबवण्यात आला होता.  या उपक्रमांतर्गत सातारा जिल्ह्यातील सर्व आस्थापनांचे सरकारी अधिकारी यावेळी उपस्थित होते.  जिल्हाधिकारी संतोष पाटील, पोलीस अधीक्षक तुषार दोशी उपस्थित होते
यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत रूपाली चाकणकर म्हणाल्या,  सात जुलै 2024 रोजी झालेला जिल्हा दौऱ्यामध्ये महिलांच्या संदर्भातील अडीचशे तक्रारी दाखल झाल्या होत्या 2025 मध्ये महिला आयोगाकडे 150 तक्रारी दाखल झाल्या त्यातील 103 तक्रारींची आज सुनावणी घेण्यात आली विधी व सेवा आयोगाच्या माध्यमातून 103 तक्रारींचा जागेवर निपटारा करण्यात आलेला आहे यामध्ये कौटुंबिक स्वरूपाच्या 53 मालमत्तेच्या 15 शारीरिक व मानसिक झाडाच्या 11 व इतर चार अशा तक्रारींचा यामध्ये समावेश होता 2025 मध्ये जिल्ह्यामध्ये आठ बालविवाह रोखण्यात आली 2024 मध्ये 16 बालविवाह रोखण्यात आली. या प्रमाणाविषयी समाधानी नसले तरी समाज मंदिर गावातील मंदिर ग्रामपंचायत धर्मादाय आयुक्त कार्यालय तसेच विवाह निबंध कार्यालय येथे बालविवाहाच्या संदर्भाने प्रसिद्धी पत्रके जाहीर करून जास्तीत जास्त जागरूकता निर्माण करण्याची गरज आहे. 
मनोधैर्य योजनेअंतर्गत 66 योजनांना मंजुरी देण्यात आली असून लेक लाडकी अभियानांतर्गत महिला व लहान मुलींच्या निर्वाह कल्याणासाठी दोन कोटी 65 लाख रुपयांचा निधी देण्यात आलेला आहे 2025 मध्ये महिला अत्याचाराच्या 143 केसेस निकालात काढण्यात आल्या तर 199 बेपत्ता युवतींपैकी 166 युवतींना शोधण्यात यश आले आहे .शासकीय व निमशासकीय कार्यालयामध्ये महिला तक्रार निवारण आयोग समिती स्थापन होऊन त्याचे विशेष ऑडिट झाले पाहिजे या संदर्भात राज्य शासन गंभीर असल्याचे त्यांनी सांगितले
सासपडे प्रकरणातील आरोपीला फाशी होईपर्यंत पाठपुरावा करणार
सासपडे,  ता. सातारा येथील अल्पवयीन मुलीची हत्या करणारा आरोपी राहुल यादव याला फाशीची शिक्षा होईपर्यंत आम्ही यासंदर्भातआम्ही पाठपुरावा करणार आहोत तसेच या प्रकरणाच्या आधी ज्या युवतीचा मृतदेह विहिरीमध्ये आढळून आला त्या संदर्भातही त्या युवकांनी खुनाची कबुली दिली आहे ती केसरी ओपन करण्यासंदर्भात पोलीस अधीक्षक यांना शिफारस करणार आहे व त्याला फाशीची शिक्षा होईपर्यंत महिला आयोग गप्प बसणार नाही,  असा इशारा चाकणकर यांनी दिला
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
