श्रीलंका आणि आयर्लंड वुमन्स संघात तीन सामन्यांची वनडे मालिका सुरु आहे. या मालिकेतील दोन सामन्यातच निकाल लागला आहे. सुरुवातीचे दोन सामने जिंकत आयर्लंडने मालिका 2-0 ने खिशात घातली आहे. पहिला सामन्यात नाणेफेकीचा कौल आयर्लंडच्या बाजूने लागला आणि प्रथम गोलंदाजी घेतली. श्रीलंकेने 50 षटकात 8 गडी गमवून 260 धावा केल्या आणि विजयासाठी 261 धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान आयर्लंडने 3 गडी आणि 4 चेंडू राखून पूर्ण केलं. दुसऱ्या वनडे सामन्यात श्रीलंकेने टॉस जिंकला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. आयर्लंडने 50 षटकात 5 गडी गमवून 255 धावा केल्या आणि विजयासाठी 256 धावांचं आव्हान दिलं. पण श्रीलंकेचा संपूर्ण 48 षटकात 240 करून बाद झाला. हा सामना आयर्लंडने 15 धावांनी जिंकला. यासह आयर्लंडने श्रीलंकेविरुद्ध पहिली वनडे मालिका जिंकली आहे. 20 ऑगस्टला होणारा तिसरा वनडे सामना हा केवळ औपचारिक असणार आहे.
दुसऱ्या वनडे सामन्यात हर्षिता समरविक्रमा आणि कविशा दिल्हारी वगळता एकही बॅटर तग धरू शकला नाही. हर्षिताने 124 चेंडत 11 चौकारांच्या मदतीने 105 धावा केल्या. मात्र तिची ही शतकी खेळी व्यर्थ गेली. तर कविशा दिल्हारीने 71 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकाराच्या मदतीने 53 धावा केल्या. पण या दोघींव्यतिरिक्त एकही बॅटर तग धरू शकला नाही. आयर्लंडकडून अर्लेने केलीने 3, जेन माग्युरेने 2, एमी माग्युरेने 1 आणि फ्रेया सर्जंटने 1 विकेट घेतली. तिसरा सामना 20 ऑगस्टला होणार आहे. हा सामना औपचारिक असणार आहे. त्यामुळे सामना जिंकला काय आणि हरला काय? त्याचा काही एक फरक मालिकेवर फरक पडणार नाही. श्रीलंकेने नुकताच अंतिम फेरीत भारताला पराभूत करून जेतेपदावर नाव कोरलं होतं.
दोन्ही संघांची प्लेइंग 11
आयर्लंडचा संघ: साराह फोर्ब्स, कॉल्टर रेली, अमी हंटर, ऑर्ला प्रेंडरगास्ट (कर्णधार), लिह पॉल, रिबेका स्टोकेल, अर्लेने केली, जेन माग्युरे, एमी माग्युरे, एलना डलझेल, फ्रेया सर्जंट
श्रीलंकेचा संघ : विश्मी गुनरत्ने, चमारी अटापट्टू (कर्णधार), हर्षिथा समरविक्रमा, कविशा दिल्हारी, अनुष्का संजीवनी, हसिनी परेरा, निलाक्षी डिसिल्वा, सचिनी निसन्सला, सुगंदिका कुमारी, अचिनी कुलासुरिया, उदेशिका प्रबोधिनी
सातारा जिल्ह्यामध्ये चुरशीने 69 टक्के मतदान |
याच साठी केला होता अट्टाहास! |
जिल्ह्यात मतदानासाठी येणार्या चाकरमान्यांची वाहतूक कोंडी |
पूर्णाहूतीने सज्जनगडावर विष्णू पंचायतन यागाची सांगता |
शिर्डीहून साईंच्या पालखीचे येत्या २९ नोव्हेंबरला प्रस्थान |
राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेमध्ये साताऱ्याच्या शर्वरी राठोड ला रौप्य पदक |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोन जणांवर गुन्हा |
गळफास घेऊन युवकाची आत्महत्या |
युवती बेपत्ता |
एसटी बसचे स्टेअरिंग निवडणूक आयोगाच्या हातात |
3348 परवाना प्राप्त अग्निशस्त्र जिल्हा प्रशासनाकडे जमा |
सातारा जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांमध्ये साहित्याचे वाटप |
गेट टुगेदरने घडवला मैत्रीचा पुनर्जन्म |
पं.जयतीर्थ मेऊंडीच्या बहारदार गायनाने श्रोते झाले मंत्रमुग्ध |
राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर हद्दपारीची एकतर्फी कारवाई; आमदार शशिकांत शिंदे यांच्यासह कार्यकर्ते आक्रमक |
राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेमध्ये साताऱ्याच्या शर्वरी राठोड ला रौप्य पदक |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोन जणांवर गुन्हा |
गळफास घेऊन युवकाची आत्महत्या |
युवती बेपत्ता |
एसटी बसचे स्टेअरिंग निवडणूक आयोगाच्या हातात |
3348 परवाना प्राप्त अग्निशस्त्र जिल्हा प्रशासनाकडे जमा |
सातारा जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांमध्ये साहित्याचे वाटप |
गेट टुगेदरने घडवला मैत्रीचा पुनर्जन्म |
पं.जयतीर्थ मेऊंडीच्या बहारदार गायनाने श्रोते झाले मंत्रमुग्ध |
राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर हद्दपारीची एकतर्फी कारवाई; आमदार शशिकांत शिंदे यांच्यासह कार्यकर्ते आक्रमक |
'उमेद'ने केले पावणे दोन लाख कुटुंबांचे समुपदेशन |
आचार संहितेचा भंग केल्यास कडक कारवाई : जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी |
महायुतीचे नेते विश्वासात घेत नसल्याची रयत क्रांती संघटनेची तक्रार |
कराड दक्षिणमधील जनता फालतू माणसाला संधी देत नाही : माजी आ. रामहरी रूपनवर |
मतदार जागृती प्रश्नमंजुषा स्पर्धा कोरेगाव येथे उत्साहात! |