आरएमसी प्लांट कंपनीमधून 50 हजारांच्या डिझेल चोरीप्रकरणी अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल

by Team Satara Today | published on : 19 October 2026


सातारा : 50 हजारांच्या डिझेलची चोरी केल्याप्रकरणी अज्ञाता विरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 18 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी लिंब, ता. सातारा गावच्या हद्दीतील शिवसमर्थ बिल्डर्स अँड डेव्हलपर्स या आरएमसी प्लांट कंपनी मधून 50 हजार रुपये किंमतीचे तीन बॅरेल डिझेल स्टोअर रूमचे कुलूप तोडून चोरून नेले आहे. याबाबतची फिर्याद प्लांट इन्चार्ज प्रशांत भस्के यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात दिली आहे. पुढील तपास पोलीस हवालदार कुमठेकर करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत सोळवंडे यांचे निधन; चार दशकांची पत्रकारितेतील वाटचाल; बुधवारी अस्थिविसर्जन
पुढील बातमी
सदर बझार येथून दुचाकीची चोरी; अज्ञातावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा

संबंधित बातम्या