खटाव : अतिवृष्टी आणि पूरहानी कार्यक्रमांतर्गत माण तालुक्यातील 41 रस्ते आणि पूल दुरुस्तीसाठी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून 25 कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेले रस्ते आणि पूल या निधीतून दुरुस्त केले जाणार आहेत.
माण तालुक्यातील तोंडले- मोगराळे रस्त्यासाठी 40 लाख, कदम वस्ती रस्ता 35 लाख, थदाळे ते बेलदेव रस्ता 60 लाख, दानवलेवाडी रस्ता 45 लाख, बिजवडी ते प्रजिमा 47 रस्ता 15 लाख, सबनीसवाडी - बिजवडी रस्ता 50 लाख, बरकडेवस्ती - येळेवाडी रस्ता 10 लाख, टाकेवाडी - पांगरी रस्ता 15 लाख, परकंदी - सनदवस्ती रस्ता एक कोटी,शिंदी खुर्द - वारुगड रस्ता एक कोटी, कांबळेवस्ती रस्ता 70 लाख, पिंगळी ते सत्रेवाडी रस्ता 35 लाख, पिंगळी ते पाटीलवस्ती रस्ता 30 लाख, लोणारबाबा रस्ता साडेतीन कोटी, दहीवडी शिंगणापूर पूलासह रस्ता अडिच कोटी,
दहीवडी-रानमळा रस्ता 35 लाख, टकलेवस्ती रस्ता 30 लाख, गोंदवले नाकाडेवस्ती रस्ता 25 लाख, राणंद-घनवटवाडी रस्ता 35 लाख, माळीखोरा रस्ता 30 लाख, रांजणी-पुजारमळा रस्ता 60 लाख, काळगोठा-भालवडी रस्ता 85 लाख, खडकी-भाटकी रस्ता 60 लाख, शिंदेवस्ती-पर्यंती रस्ता 50 लाख, पाटीलमळा रस्ता 50 लाख, हवालदारवाडी रस्ता 30 लाख, हिंगणी रस्ता 60 लाख, हिंगणी - खडतरेवस्ती रस्ता 50 लाख, म्हसवड - ढोकमोडा रस्ता 15 लाख, पुळकोटी रस्ता 60 लाख, पुळकोटी-गलांडेवस्ती रस्ता 30 लाख, धामणी-दिवड रस्ता 25 लाख, ढाकणी-गट्टेवाडी रस्ता 30 लाख, धामणी-गट्टेवाडी रस्ता एक कोटी 30 लाख, ढाकणी
गट्टेवाडी रस्ता 30 लाख, पिंपरी-लोधवडे रस्ता 60 लाख, शेळकेवस्ती-मायणी रस्ता 50 लाख, कुकुडवाड-शिवाजीनगर रस्ता 80 लाख, ढाकणी-वळई रस्ता 50 लाख, लांडेवाडी-कापूसवाडी रस्ता 40 लाख, नरळेवस्ती रस्ता 60 लाख, पानाडवस्ती रस्ता 30 लाख असा एकूण 25 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.