सातारा : सातारा नगरपालिकेतील प्रशासन काळात झालेल्या कामकाजाची चौकशी करणे व पुणे मुंबई महानगरपालिका क्षेत्राप्रमाणे सातारा नगरपरिषद क्षेत्रातील 600 चौरस फूट मिळकतींना शून्य करआकारणी करणे या मागण्यांचे निवेदन महाविकास आघाडीच्यावतीने अंदाजपत्रकीय सभेच्या पूर्वसंध्येला नगराध्यक्ष अमोल मोहिते यांना सादर करण्यात आले.
निवेदन सादर करताना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शहराध्यक्ष सुनील गाडेकर, उपाध्यक्ष सचिन बागल, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे अमोल खुडे, प्रदेश युवक भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या सरचिटणीस मनीषा साळुंखे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस सादिक बागवान, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहराध्यक्ष प्रणव सावंत, शहर सुधार समितीचे असलम तडसरकर, शहर सुधार समितीचे संयोजक विजय निकम, शैलेश बोडके, सुमित नाईक इत्यादी सदस्य यावेळी उपस्थित होते.
सुनील काळेकर यांच्या नेतृत्वाखाली सादर करण्यात आलेल्या निवेदनात नमूद आहे की, सातारा नगरपालिकेने सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याचे अंदाजपत्रक सादर करावे सातारा शहर परिसर व उपनगरांमध्ये ई-बस सेवा तात्काळ सुरू करावी सातारा पालिकेच्या सर्व सभा लाईव्ह ऑनलाईन कराव्यात सातारा नगरपरिषद प्रशासक काळामध्ये जे गैरव्यवहार झाले त्याची चौकशी करण्यात यावी अशा विविध मागण्या यावेळी सादर करण्यात आल्या. सातारा शहरात नागरिकांना हितकारक ठरतील पायाभूत सुविधांचे दर्जेदार ठराव अंदाजपत्रकीय सभेमध्ये अंतर्भूत करण्यात अशी अपेक्षा सर्व सदस्यांनी नगराध्यक्ष अमोल मोहिते यांच्याकडे व्यक्त केली.