अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील 'त्या' हल्लेखोरास तीन दिवस पोलीस कोठडी

by Team Satara Today | published on : 04 January 2026


सातारा  : अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे कोषाध्यक्ष व साताऱ्यात होत असलेल्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी यांचा गळा आवळून काळे फासत त्­यांच्या डोळ्यांना इजा केल्­याप्रकरणी संशयिताला अटक करण्यात आली. संशयिताला न्­यायालयात हजर केले असता त्­याला ६ जानेवारी रोजी पर्यंत तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

साताऱ्यातील छत्रपती शाहू क्रीडा संकुलात शनिवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली होती. संमेलनातील प्रकाशन मंच या दालनात पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम सुरु होता. यावेळी संशयित आरोपीने विनोद कुलकर्णी यांच्यावर झडप घालत त्­यांचा गळा आवळला. त्यानंतर झटापट करत त्­यांच्या तोंडाला काळे फासले. या सर्व घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली व महाराष्ट्रभरात त्­याचे संतप्­त पडसाद उमटले. या घटनेनंतर पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतले. तर विनोद कुलकर्णी यांच्या डोळ्याला इजा झाल्­याने त्यांना  उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले.

शाहूपुरी पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्­हा दाखल झाल्­यानंतर संशयित संदीप जाधव याला अटक करण्यात आली. रविवारी संशयिताला शाहूपुरी पोलिसांनी न्­यायालयात हजर केले असता संशयिताला ६ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. याप्रकरणी मूळ फिर्यादीतर्फे सरकारी वकील व त्यांना सहाय्य करणारे ॲड. श्रीकांत पन्हाळे यांनी युक्तीवाद केला होता. याबाबतचा अधिक तपास सपोनि शिर्के करत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
कामाठीपुरा येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त पुस्तक वाटप आणि वाचन उपक्रम
पुढील बातमी
सामाजिक वास्तवावर आसूड ओढणाऱ्या कवितांनी निमंत्रितांचे कविसंमेलन गाजले; मानवी जीवनातील विदारक वास्तव मांडणाऱ्या कवितांनी रसिकांना केले अंतर्मुख

संबंधित बातम्या