सातारा : प्रयागराज येथे झालेल्या महाकुंभ मेळाव्यात गंगा स्नान करण्यासाठी सातारा जिल्ह्यातील भाविकांसाठी एसटी महामंडळाने अल्प तिकीट दरात विशेष बसची सोय केली होती. मागील महिनाभरात सातारा-प्रयागराज अशा सात एसटीच्या फेऱ्या झाल्या असून, शेवटच्या फेरीतील प्रवाशांना घेऊन बस आज रात्री शहरात दाखल झाली.
महामंडळाच्या या सेवेचा लाभ महिनाभरात ३०० भाविकांनी घेतला असून, त्या माध्यमातून तब्बल २० लाखांहून अधिक उत्पन्न महामंडळाच्या तिजोरीत पडल्याची माहिती सातारा डेपोचे स्थानकप्रमुख राहुल शिंगाडे यांनी दिली.