सातारा : एका युवकास मारहाण केल्याप्रकरणी दोनजणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, ‘अध्यक्ष बोलायला सांगितले होते. तू का बोलत नाही,’ असे म्हणत दोघांनी पोवई नाक्यावर एका युवकाला मारहाण केली. मोहित पाटोळे, तनिष्क कांबळे या दोघांविरुध्द आर्यमान महेश डवरी (वय 21, रा. गोडोली, सातारा) या युवकाने सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. ही घटना दि. 22 जुलै रोजी घडली असून संशयितांनी शिवीगाळ, दमदाटी करत डोक्यात दगड मारला. तसेच या झटापटीत तक्रारदारची सोन्याची चेन गहाळ झाली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. अधिक तपास पोलीस हवालदार पोळ करीत आहेत.