सातारा : जिल्हा रुग्णालयातून एक जण बेपत्ता झाल्याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, निलेश शिवाजी कदम रा. नेहरवाडी, ता. कोरेगाव, जि. सातारा यांच्यावर जिल्हा रुग्णालयातील वॉर्ड नंबर 9 येथे उपचार सुरू होते. दि. 10 रोजी 7 वाजण्याच्या दरम्यान तेथून बेपत्ता झाले आहेत. अधिक तपास महिला पोलीस हवालदार सावंत करीत आहेत.