हिंगणी येथे घडलेल्या घरफोडीच्या गुन्ह्याचा उलगडा करण्यात म्हसवड पोलिसांना यश; एकाला अटक

by Team Satara Today | published on : 12 June 2026


म्हसवड : माण तालुक्यातील हिंगणी येथे घडलेल्या घरफोडीच्या गुन्ह्याचा उलगडा करण्यात म्हसवड पोलिसांना यश आले असून चोरीस गेलेला संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी सागर नवनाथ खांडेकर (वय २४) याला अटक करण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दि. २ जून रोजी सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास हिंगणी (ता. माण) येथील ताई उत्तम खांडेकर यांच्या राहत्या घराच्या दरवाजाची कडी-कोयंडा तोडून अज्ञात चोरट्याने घरातील पर्समध्ये प्लास्टिकच्या पिशवीत ठेवलेले चांदीचे हातातील कडे, चांदीचा छल्ला, मासोळ्या तसेच गळ्यातील सोन्याचा बदाम आदी दागिने असा सुमारे 30 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता.

याप्रकरणी दाखल झालेल्या तक्रारीनंतर म्हसवड पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक संदीप पोमन यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलिस हवालदार हांगे यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. तपासादरम्यान सागर नवनाथ खांडेकर याचा गुन्ह्यात सहभाग निष्पन्न झाल्याने त्याला अटक करण्यात आली. तसेच चोरीस गेलेला संपूर्ण मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे.


म्हसवड पोलिसांच्या या कामगिरीबद्दल हिंगणी व परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. दरम्यान, नागरिकांनी गावात संशयित व्यक्ती अथवा संशयास्पद हालचाली आढळल्यास तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन सपोनि संदीप पोमन यांनी केले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
पुसेसावळीतील माय-लेकीचा तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू ; ​मणेराजुरी परिसरातील हृदयद्रावक घटना
पुढील बातमी
जिल्ह्यातील १०५ गावे व ३४२ वाडयांना ९७ टँकरने पाणीपुरवठा; पावसाने ओढ दिल्यास पाणी टंचाईचा प्रश्न आणखी ऐरणीवर येणार

संबंधित बातम्या