सातारा : सातारा येथील कृष्णा नगर परिसरातील कांची कामकोटी चे पिठाचे शंकराचार्य परमपूज्य श्री चंद्रशेखरेन्द्र सरस्वती महास्वामी तसेच कांची कामकोटी पिठाचे शंकराचार्य परमपूज्य श्री जयेंद्र सरस्वती व सध्याचे पिठाधिपती परमपूज्य श्री शंकर विजयेंद्र सरस्वती यांच्या पूर्णांग्रह आणि शुभ आशीर्वादाने, सातारा येथील श्री उत्तर चिदंबरम नटराज मंदिरात प्रतिवर्षाप्रमाणे सोमवार दि. 22 सप्टेंबर ते गुरुवार दि. 2 ऑक्टोबर दरम्यान शारदीय नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे. नवरात्री उत्सवानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. सांस्कृतिक कार्यक्रमात दररोज सायंकाळी सहा ते साडेसात या वेळेत भरतनाट्यम गायन वादन अधिक कार्यक्रम संपन्न होत आहेत.
या नियोजित कार्यक्रमांमध्ये शुक्रवार दि. 27 रोजी सायंकाळी सहा वाजता नटराज नृत्यकला शाळा साताराच्या सिद्धी आणि शलवी भुरके यांचे भरतनाट्यम सादर होणार आहे. रविवार दि. 29 रोजी रुचिरा इंगळे आणि त्यांच्या शिष्यांचा भरतनाट्यम चा कार्यक्रम संपन्न होणार आहे. सोमवार दि. 30 रोजी सायंकाळी सहा वाजता प्रतीक सदामते यांच्या ब्ल्यू नोट गिटार क्लासेसच्या कलाकारांचे सामुदायिक गिटार व विविध वाद्यांचे वादन संपन्न होणार आहे. या कार्यक्रमांना प्रवेश विनामूल्य असून सर्व सातारकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कलाकारांना प्रोत्साहन द्यावे तसेच या विविध कलांचा आस्वाद घ्यावा असे आवाहन नटराज मंदिराचे व्यवस्थापकीय विश्वस्त रमेश शानभाग व या कार्यक्रमाच्या संयोजिका सौ. उषा शानभाग यांनी केले आहे.
नटराज मंदिरात या नवरात्र उत्सव कार्यक्रमांमध्ये दि. 22 ते गुरुवार दि. 2 ऑक्टोबर दरम्यान दररोज सकाळी आठ ते दहा या वेळेचे दुर्गा सप्तशती पारायण सकाळी दहा ते अकरा या वेळेत श्री उमादेवी यांना ललिता सहस्त्रनाम अर्चना, आरती, सुवासिनी पूजा व श्री शिवकामसुंदरी देवी यांना ललिता सहस्त्रनाम सायंकाळी साडेपाच वाजता होणार आहे .
शुक्रवार दि. 26 सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता वेदमूर्ती दत्ता शास्त्री जोशी यांचेकडून ललिता पंचमीनिमित्त सौंदर्य लहरी पारायण संपन्न होणार आहे. रविवार दि. 28 सप्टेंबर रोजी सकाळी आठ ते बारा या वेळात वेदमूर्ती व ब्रह्मवृद्धांच्या हस्ते चंडी होम होणार असून सकाळी दहा ते अकरा या वेळेत कन्या पूजा म्हणजेच कुमारी पूजा केली जाणार आहे. दुपारी एक ते तीन दरम्यान महाप्रसाद वितरित केला जाणार आहे. बुधवार दि. एक ऑक्टोंबर रोजी महिलांकडून मंदिरात दीप पूजा, दीपोत्सव संपन्न होणार आहे. गुरुवार दि. 2 ऑक्टोबर रोजी विजयादशमी अर्थात दसरा सणानिमित्त सकाळी 11 वाजता विशेष महापूजा मंदिरात केली जाणार आहे. नवरात्री उत्सव काळामध्ये उमादेवीला रोज विविध अलंकार घालण्यात येणार असून गुरुवार दि. 2 डिसेंबर रोजी शाकंभरी रूपातील भाज्यांचे अलंकार घालून विशेष पूजा केली जाणार आहे. मंदिराच्या या सर्व कार्यक्रमांना सातारकर भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, हे सर्व कार्यक्रम विनामूल्य असून मंदिराचा दैनंदिन खर्च जनता जनार्दनाच्या देणग्यांमधून केला जातो, त्यामुळे आपल्या इच्छेनुसार आपणही या धार्मिक कार्यात तन, मन, धन अर्पण सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.