सातारा : कॅफेमध्ये अश्लील कृती केल्याप्रकरणी तीन जणांविरोधात सातारा शहर पोलिसांनी कारवाई केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 7 रोजी दुपारी दीड वाजता सदर बाजार, विसावा नाका परिसरातील एसआरके कॅफे या ठिकाणी सातारा शहर पोलिसांनी छापा मारला. कॅफेमध्ये पूर्ण बैठक व्यवस्था सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या कक्षेपासून दूर ठेवून तसेच कॅफेमध्ये दरवाजे अपारदर्शक ठेवून अंधार करून येणाऱ्या जाणाऱ्या व्यक्तींचे नोंदणी रजिस्टर न ठेवता कॅफेमध्ये अश्लील कृती करण्यास अप्रेरणा दिल्या प्रकरणी कॅफेचालक सुशांत युवराज कदम रा. सोनगाव, ता. सातारा तसेच कॅफेमध्ये अश्लील कृती केल्या प्रकरणी चिन्मय सुरेश कर्वे राहणार मल्हारपेठ सातारा आणि सातारा शहरात राहणाऱ्या युवतीवर कारवाई करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार भोसले करीत आहेत.