08:17pm | Dec 11, 2024 |
सातारा : सातारा येथील जय भवानी नागरी सहकारी पतसंस्था सातारा चेअरमन व संचालकाच्या बेकायदेशीर आर्थिक व्यवहारामुळे चेअरमन विलास आंबेकर व सहाय्यक निबंधक सहकारी संस्था राहुल देशमुख यांनी संगनमताने भ्रष्टाचार करून ठेवीदारांना, सभासदांना वार्यावर सोडून दिनांक 14 नोव्हेंबर रोजी अवसायानात निघाल्याचे आदेश पारित केलेले आहेत. त्यामुळे अशा सहाय्यक निबंधकांना निलंबित करावे. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा माजी उपनगराध्यक्ष शंकर माळवदे यांनी दिला आहे.
याबाबत प्रसिद्ध केलेल्या पत्रकात नमूद आहे की, कायद्याप्रमाणे संस्था अवसयानात काढण्यापूर्वी सभासद, ठेवीदार, कर्जदार यांना नोटीस पाठवून त्यांचे म्हणणे ऐकल्याशिवाय आदेश काढता येत नाहीत. परंतु, सहाय्यक निबंधक व विलास आंबेकर यांनी स्वतःच्या फायद्यासाठी कोणत्याही सभासदाला नोटीस न पाठवता आदेश पारित केलेले आहेत. आदेशाची तारीख 14 नोव्हेंबर 2024 आहे व सभासदांना सुनावणीची तारीख 10 नोव्हेंबर 2024 ठेवलेली आहे. म्हणजेच आदेश काढण्यापूर्वी सुनावणीची तारीख यालाच उलटी गंगा म्हणतात. अशा गोष्टी घडण्याचे कारण म्हणजे मनात दुष्ट हेतूने व साठेलोटे करून घेतल्याशिवाय घडत नाहीत. मी दोन वर्षापासून सहाय्यक निबंधक यांच्याकडे सदरची संस्था बेकायदेशीर रित्या चेअरमन यांनी बंद केलेली आहे, असे लेखी कळवून देखील त्यांनी मला स्थळ पंचनामा करून संस्था चालू असल्याचे कळविले होते. मग अचानक असं काय घडलं की संस्था बंद असल्यामुळे अवसयकाची नेमणूक करण्याचे आदेश पारित झालेत. या सर्व गोष्टी संशयास्पद असून किंवा भ्रष्टाचार झाल्याशिवाय घडलेल्या नाहीत. म्हणून माझी वरिष्ठांना मागणी आहे त्यांनी त्वरित सहाय्यक निबंधक सहकारी संस्था राहुल देशमुख यांची खातेनिहाय चौकशी करावी व चौकशी होईपर्यंत त्यांना निलंबित करण्यात यावे. अन्यथा अशाच प्रकारचे गैरव्यवहार बेकायदेशीर आदेश इतर संस्थांबाबत होऊ शकतात याची प्रशासनाने काळजी घ्यावी.
अनेक संचालकांनी राजीनामे सुद्धा दिलेले आहेत. परंतु त्याबाबत सहाय्यक निबंधक कायदेशीर कारवाई न करता बेकायदेशीर मार्गाचा अवलंब करत आहेत. ज्यांच्या हातात संस्था सुरक्षित चालाव्यात म्हणून जबाबदारी आहे तेच असे बेकायदेशीर कृत्य करीत आहेत. म्हणजेच कुंपणानेच शेताला खाल्ल्यासारखे आहे. सहाय्यक निबंधक यांच्या या बेकायदेशीर कृत्याची वरिष्ठांनी नोंद न घेतल्यास व त्यांना निलंबित न केल्यास उग्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल व त्याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील, याची नोंद घ्यावी. यापूर्वी सुद्धा प्रशासनातील अधिकार्यांनी तसेच संस्थेतील संचालकांच्या गैरकारभारामुळे त्यांच्यावर सातारा येथील न्यायालयात फौजदारी स्वरूपाचे खटले चालू आहेत, याची योग्य ती समज वरिष्ठ अधिकार्यांनी घ्यावी. अन्यथा बेकायदेशीर कृत्याबद्दल त्यांच्यावर सुद्धा मी कायदेशीर मार्गाचा व लोकशाही मार्गाचा अवलंबन करेन. अवसायानात संस्था काढण्यापूर्वी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यांनी ठेवीदारांच्या ठेवी कशा देणार, याचा जरा सुद्धा विचार केलेला नाही.मराठी विश्वकोशाचे ट्विटरवर दुसरे साहित्य संमेलन |
पालकमंत्री पदाचे खरे हक्कदार ना. शिवेंद्रराजेच : श्रीरंग काटेकर |
बुलेट सायलेन्सर वर सातारा शहर वाहतूक शाखेची कारवाई |
मानवी मूत्रापासून ऊर्जानिर्मिती |
सार्वजनिक बांधकामच्या प्रकल्पांसाठी निधी कमी पडणार नाही |
उद्यापासून सातारा येथील सेव्हन स्टारमध्ये माय मराठी महोत्सवास प्रारंभ ! |
अजिंक्यतारा कारखान्याला तांत्रिक कार्यक्षमतेचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार |
बिबट्याच्या हल्ल्यात सातारचे वनक्षेत्रपाल जखमी |
सातारा शहरातून दोन दुचाकींची चोरी |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर कारवाई |
जिल्ह्याचे नूतन पालकमंत्री बदला, अन्यथा उपोषण |
सासवडच्या अल्पवयीन मुलावर डॉक्टरांकडून चुकीचे उपचार |
छत्रपती शाहू क्रीडा संकुलातील गैरवस्थापनावर क्रीडा प्रशिक्षकाचे बोट |
'अजिंक्यतारा'चे कामकाज सहकारी कारखानदारीसाठी दिशादर्शक |
प्रतापगड साखर कारखान्याकडू प्रतिटन ३ हजार रुपयांप्रमाणे ऊस बिल जमा |
उद्यापासून सातारा येथील सेव्हन स्टारमध्ये माय मराठी महोत्सवास प्रारंभ ! |
अजिंक्यतारा कारखान्याला तांत्रिक कार्यक्षमतेचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार |
बिबट्याच्या हल्ल्यात सातारचे वनक्षेत्रपाल जखमी |
सातारा शहरातून दोन दुचाकींची चोरी |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर कारवाई |
जिल्ह्याचे नूतन पालकमंत्री बदला, अन्यथा उपोषण |
सासवडच्या अल्पवयीन मुलावर डॉक्टरांकडून चुकीचे उपचार |
छत्रपती शाहू क्रीडा संकुलातील गैरवस्थापनावर क्रीडा प्रशिक्षकाचे बोट |
'अजिंक्यतारा'चे कामकाज सहकारी कारखानदारीसाठी दिशादर्शक |
प्रतापगड साखर कारखान्याकडू प्रतिटन ३ हजार रुपयांप्रमाणे ऊस बिल जमा |
एसटीच्या चाकाखाली सापडून वृद्धाचा मृत्यू |
विडणी खून प्रकरणातील तिसऱ्या दिवशी शेतात हातासह हत्यारे सापडल्याची माहिती |
सातारा जिल्ह्याला ‘पर्यटन जिल्हा’ म्हणून ओळख देणार : ना. एकनाथ शिंदे |
मारहाण प्रकरणी दोनजणांवर गुन्हा |
आर.टी.ई अंतर्गत राज्यातील इंग्रजी स्कूलचे २४०० कोटी थकले |